पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उदयपूर जिल्ह्यातल्या झाडोल तालुक्यातील बडा भिलवाडा व श्यामपुरा या अरवलीतील दोन गावांनी उदयपूरच्या सेवा मंदिर संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने केसरियाजी या देवतेच्या आशीर्वादाने “केशर छिडकावा” करुन संयुक्त वनव्यवस्थापनाच्या क्षेत्रात देवराई स्थापली आहे. येथून लोकांना केवळ गवत कापून नेण्याची परवानगी आहे, व त्यासाठी लोक वनव्यवस्थापन समितीकडे पैसे भरुन गवत कापतात. । | भारतभर सामूहिक वनसंपत्तीच्या क्षेत्रांत लोकांनी काही हिस्सा, उदा. ५-१० टक्के क्षेत्र अशा रीतीने “सुरक्षावन” म्हणून सर्व हस्तक्षेपांपासून मुक्त ठेवल्यास सर्वदूर जैवविविधतेने समृद्ध अशा राया, तळी, डोह निर्माण होऊ शकतील. सर्व लोकांना या निसर्गसृष्टीच्या आनंदाचा उपभोग घेता येईल. अशा विचारानेच महाराष्ट्रातील “सहभागी वन व जैवविविधता व्यवस्थापन समन्वय” या राज्यपातळीवरील कार्यरत समन्वयानेनेटवर्कने- सूक्ष्म कार्य आराखडे बनवताना १०% क्षेत्र हे सुरक्षावन म्हणून निश्चित करावे असे मान्य केले आहे. कृषिवैविध्याचे जतन ज्या जमिनींवर खाजगी मालकी मिळेल, त्यांवर लोक ब-याच प्रमाणात शेती करतील, पण आता त्यांना या जमिनीवर फळझाडेही लावता येतील. गरजेपोटी यातील ब-याच जमिनीवर सेन्द्रिय शेती केली जाते, व गावरान वाणांची व अनेक वेगवेगळ्या पिकांची लागवड होते. अशा जमिनीवर गावरान वाणांच्या संवर्धनाचे कार्यक्रम राबवणे उचित आहे. | या संदर्भात “पिकांचे वाण व शेतक-यांचे हक्क संरक्षण कायदा २००१” याचा फायदा उठवता येईल. या कायद्यामध्ये पारंपारिक व शेतक-यांनी निर्माण केलेल्या वाणांची नोंद करण्याची तरतूद केली आहे. हा कायदा अंमलात आणणाच्या प्राधिकरणापाशी एक राष्ट्रीय जनुक निधी” आहे. या निधीचा विनियोग ज्या पारंपारिक अथवा शेतक-यांच्या वाणाच्या आधारावर व्यापारी वाण बनवले गेले, त्याबद्दल सामूहिक अथवा वैयक्तिक लाभांश पुरवण्यासाठी करावा अशी अपेक्षा आहे. तसेच या निधीतून पंचायतींना शेतक-यांच्या स्वतःच्या शेतावर असे वाण जतन करण्यास सक्षम करण्यासाठी मदत करावी अशी तरतूद आहे. या तरतुदींचा फायदा उठवून खाजगी मालकी दिल्या गेलेल्या वन जमिनीवर पिकांच्या पारंपारिक गावरान वाणांचे, तसेच विविध वाणांच्या फळझाडांचे संगोपन करण्याचे प्रयत्न करता येतील.