पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अशा वनसंपत्तीचे संरक्षण करायला, संवर्धन करायला रोजगार हमी योजनांतील पैसे सहज उपलब्ध होऊ शकतील. ग्रामसभेने बनवायच्या रोहयोच्या योजनांत खालील घटक असू शकतील: (क) निसर्गक्रमाने पुनरुज्जीवनाला प्रोत्साहन देणे (ख) रोपवाटिकांत रोपे वाढवणे । (ग) मृद व जलसंधारणासह लागवड करणे (घ) वनसंपत्तेची रखवाली, निगारणी करणे याखेरीज या उपक्रमात खालील गोष्टींकडे लक्ष पुरवावे लागेल: (च) बिया गोळा करणे, बीजभांडारे प्रस्थापित करणे, (छ) शाश्वत उत्पन्न मिळत राहील अशा पद्धतीने वापर करणे (ज) स्थानिक पातळीवर संस्करण, मूल्यवर्धन करणे (झ) विक्रीची व्यवस्था करणे (ञ) उपयुक्त जाती-प्रजातींबद्दल सर्व प्रकारची माहिती- परिसराशी संबंध, पुनरुत्पादन, उपयोग, मूल्यवर्धन, बाजारपेठेतील मागणी-संकलित करून, चांगल्या छाया चित्रांसहित, मराठीत व इंग्रजीत संगणकीकृत डेटाबेस बनवणे । (ट) पोषणमूल्य, खाद्य निर्मितीच्या प्रक्रिया, विक्रीची तंत्रे यांवर विशिष्ट महत्वाचे असणारे अभ्यास करणे (ठ) प्रत्यक्षात जमिनीवर, वेगवेगळ्या नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीत बीजसंकलन, रोपवाटिका, नैसर्गिक व कृत्रिम पुनरुज्जीवन, उत्पादने काढण्याची तंत्रे, संस्करण व बाजारपेठांचे अभ्यास करणे. सुरक्षावनांचे नवनिर्माण | देवरायांची परंपरा ही जरी मानवाच्या निसर्गपूजेच्या परंपरांशी निगडित आहे, तरी या रीतीने सांभाळलेल्या वनराजीतून आपले हितसंबंध जपले जात आहेत याची लोकांना जाणीव असते असे अनेक अनुभव आहेत. म्हणूनच आजच्या धर्माचा संदर्भ पूर्ण बदलेल्या परिस्थितीतही ही परंपरा नुसती टिकूनच नाही, तर काही ठिकाणी पुनरुज्जीवित होत आहे. अशी सुरक्षावने नव्यानेही प्रस्थापित केल्याची काही उदाहरणे आहेत. पिठोरागड-आल्मोड़ा जिल्ह्यांच्या सीमेवरील धर्मगड भागात २५ गावातल्या लोकांनी एकत्र येऊन डोंगरमाथ्यावर मोठीच्या मोठी राई “कोकिला माता” या देवीच्या नावाने राखली आहे. यातून लोकांना वाळके लाकूड, डहाळ्या नेता येतात, मात्र जिवंत झाड तोडले तर देवीचा कोप होईल अशी भावना लोकांनी मानली आहे. अशाच रीतीने राजस्थानच्या