पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पार पाडला. या संदर्भात लोकांना खास लक्ष पुरवण्याची जरूर असलेल्या जीवजाती कोणत्या असे विचारता ढोमनीपाटा या मेलघाटमधील गावातल्या लोकांनी १६२ प्रजातींची नावे सुचवली. यात २३ औषधी वनस्पती, ५० वृक्ष, १० मासे, खेकडे, झिंगे, कासव इत्यादि जलचर, आणि अनेक बेडूक, सरडे, पक्षी, पशूचा समावेश आहे. यातील सिताफळ, आवळा, बोर, पेरु, मोह, चारोळी, आंबा, रामफळ, चिंच, मोह, जामुन, तीवस, बीबा, सेवगा, सुबाबुळ. सोसो, करवंद या १६ प्रजातींची रोपे मुद्दाम तयार करून लागवड करण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत कृतिआराखडाही बनवला. उघडच आहे की ह्या सुवर्णसंधीचा फायदा उठवून आपण सर्वांनी मिळून देशाच्या जैवविविधतेच्या संवर्धनाचा, पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम राबवला पाहिजे. या कार्यक्रमाचा रोख आपल्या स्वकीय वनस्पतिसृष्टीवर असावा. म्हणजे सीताफळासारख्या शतकानुशतके आपल्याकडच्याच झालेल्या व आज महाराष्ट्रातल्या अनेक डोंगरांवर वाढणाच्या जातीला मूळची परकीय म्हणून नकोच म्हणायची जरुर नाही. परंतु नुकत्याच आयात केलेल्या व जनमानसात, निसर्गात काहीही खास स्थान नसलेल्या ग्लिरिसीडिया अथवा बेशरम सारख्या वनस्पतींना या उपक्रमात काहीही भूमिका नसावी, व मुद्दाम आणखी जट्रोफा सारख्या परकीय वनस्पति घुसवू नयेत. याच्याच जोडीला देवरायांच्या धर्तीवर सुरक्षावनेही पुनरुज्जीवित करावीत. परिसराचे पुनर्निर्माण सामूहिक वनसंपत्तीच्या भूमीला सुस्थितीत आणून, जैवविविधतेने नटवून, त्यातून लोकांना पोषणाला, उपजीविकेला आधार देणा-या अशा कार्यक्रमात खालील घटक असू शकतील. | अ) वेगवेगळ्या परिस्थितींना, हवापाण्याला, जमिनीला अनुरूप, जसे उजाड अथवा पूर्ण आच्छादित वनराजीत वाढणा-या, किंवा लागलीच अथवा अनेक वर्षांनी उत्पादन देणा-या, परिसराच्या, उदरनिर्वाहाच्या अथवा अर्थार्जनाच्या दृष्टीने वेगवेगळे महत्व असलेल्या वनस्पति, झुडुपे, वेली, वृक्ष निवडणे. आ) अशा रीतीने सामूहिक वनसंपत्तीच्या संवर्धनाच्या दृष्टीने अंतर्भूत केलेल्या जातीप्रजाती, विविध प्रकारच्या सेवा पुरवू शकतीलः (१) जमिनीची धूप थांबवणे, पाणी मुरवणे (२) कुंपण (३) सरपण (४) चारा (५) हिरव्या पाल्याचे खत (६) झोपड्यांना शाकारणी (७) लहान-सहान अवजारांसाठी लाकूड (८) बांबू (९) वेल (१०) टोपल्या, चटया विणणे (११) घरी खाण्यासाठी रानचा मेवा-विशेषतः यातून सूक्ष्मपोषके (उदा. जीवनसत्वे, खनिजे, अँटी-ऑक्सिडन्ट) मिळू शकतील असा, (१२) करवंदे, जांभळे, कढीलिंब, सीताफळांसारखे विक्रीला योग्य खाद्य पदार्थ (१३) डिंक (१४) औषधी वनस्पति (१५) तेंदू (१६) लाख (१७) मध