पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

AAA कर्नाटकातल्या हळकारचे ग्रामवन टिकून आहे. लोक रत्नागिरीतील खाजगी जंगले मोठ्या प्रमाणात संभाळून आहेत ओरिसात मोया प्रमाणावर सामूहिक वन संरक्षणातून जंगलाचे पुनरुज्जीवन झाले आहे. | हेही लक्षात ठेवण्याजोगे आहे की स्वित्झर्लंडची केवळ गेल्या दीडशे वर्षात फोफावलेली विपुल वनराजी सर्वतः गावसमाजांच्या मालकीची आहे. तेव्हां आता हा कायदा अमलात आला आहे. याबद्दल आपल्या काहीही शंका-कुशंका असतील तरी त्या क्षणभर बाजूला ठेऊन यातून काय चांगले निष्पन्न होऊ शकेल याचा सकारात्मक, रचनात्मक भूमिकेतून पाठपुरावा करायला पाहिजे. ह्या दृष्टीने चार पद्धतीचे कार्यक्रम आपण हाती घेऊ शकूः > सामूहिक वनभूमीवर वैविध्यपूर्ण आणि त्याबरोबरच लोकोपयोगी वनस्पतिसृष्टी उभी करणे सामूहिक भूमीच्या ५-१० टक्के हिश्श्यांवर निसर्गरक्षणासाठी पूर्ण संरक्षण । देणे-देवरायांच्या पद्धतीवर. खाजगी मालकी दिल्या गेलेल्या वन जमिनीवर पिकांच्या पारंपारिक गावरान वाणांचे संगोपन करणे > खाजगी मालकी दिल्या गेलेल्या वन जमिनीवर विविध वाणांच्या फळझाडांचे संगोपन करणे | A _A सामूहिक भूमि वनाधिकार कायद्यानुसार स्थानिक समाज ज्या भूमीचा पूर्वापार वापर करत आलेले आहेत, यात राखीव व संरक्षित जंगल, अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांची भूमीही समाविष्ट असेल, अशा जमिनीवर लोकांना सामूहिक हक्क सुद्धा मिळतील. ह्या सामूहिक हक्कांत खालील हक्क अंतर्भूत असतील. । | गावाच्या हद्दीतून किंवा हद्दीबाहेरुन जे गौण वनोपज परंपरेने गोळा केले जात आहेत अशा वनोपजांवरील मालकी हक्क , गोळा करण्याचा, वापरण्याचा अथवा विकण्याचा अधिकार कायद्याप्रमाणे गौण वनोपजात इमारती लाकूड वगळता इतर वनस्पतिजन्य उत्पादने, बांबू, काया, बुधे, वेल, टसर, रेशमाचे कोष, मध, मेण, लाख, तेंदू, औषधी वनस्पति, कंदमुळे या सर्वांचा समावेश होईल. > इतर सामूहिक उपयोगांचे अधिकार-यांच्यात मासे व इतर जलाशयांतील उत्पादन, चराई-स्थायिक व फिरस्ती या सर्वांचा समावेश होईल