पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्या उलट काय अपेक्षा आहे, तर-लोकपराङ्मुख शासकीय यंत्रणेचे हात अधिक बळकट केल्यास वृक्षराजी, वन्यजीवन, जैवविविधता चांगली जोपासली जाईल, बाहेरचे आक्रमण थांबवले जाईल. पण आपला अनुभव काय आहे? इंग्रज काळातला प्रचंड विध्वंस बाजूला ठेऊन; केवळ स्वातंत्र्योत्तर कालाचा विचार केला तरीः > शासनयंत्रणेच्या हाती भारताचा जवळजवळ ११% भूभाग -खाजगी जंगलांचा -सोपवला गेल्यानंतर दिरंगाई व भ्रष्टाचारातून त्यावरची बहुतांश वृक्षराजी तोडली गेली. _A > जिथे जिथे विकास प्रकल्पांनी दुर्गम भागात रस्ते आणले, तिथे तिथे सरकारच्या ताब्यातील जंगलाची मोठ्या प्रमाणावर तोड झाली. वनाधारित उद्योगांना जवळजवळ फुकट माल पुरवला जाऊन बांबू, तसेच प्लायवुडसाठी उत्कृष्ट अशी प्रचंड झाडे, बेपर्वाईने तोडली जाऊन वृक्षराजीची दुर्दशा झाली. > वनविकास मंडळे-सलीम अलींच्या व इंदिरा गांधींच्या शब्दात- वनविनाश | मंडळे बनून वैविध्यसंपन्न, नैसर्गिक जंगल मोठ्या प्रमाणात तोडले गेले. > देवरायांसारखा जैवविविधतेचा ठेवा अनेक बतावण्यांनी वनविभागाने नष्ट करण्यात मोठी भूमिका बजावली. लोकांना वैरी बनवल्याने त्यांच्या पाठिंब्याविना वीरप्पन्सारख्या तस्कराला पकडण्यात १५-२० वर्षे अपयशी राहून त्याच्या टोळी मार्फत सर्व चांगले वाढलेले चंदन व सुळेवाले हत्ती-सा-या कर्नाटक, तामिळनाडू, केरळातले -नष्ट झाले. > सरिष्कासारख्या भरपूर पैसे, साधन-संपत्तीने समृद्ध व्याघ्रप्रकल्पातून सारे वाघ | मारले गेले तरी ते प्रत्यक्षात थांबवले नाही, केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत खोटे सांगत राहिले. > लोकपराङ्मुख भूमिकेमुळे भरतपूरच्या सरोवरासारख्या अनेक स्थळांची दुर्दशा झाली. याउलट, लोकांना जबाबदारीने काहीही करणे अशक्य होईल, त्यांचे संघटन कमकुवत होईल, त्यांना दिलेली आश्वासने अजिबात पाळली जाणार नाहीत, त्यांना भ्रष्टाचारात सहभागी केले जाईल अशी परिस्थिती असूनहीः > देशभर अजूनही वड-पिंपळ-उंबर ही परिसराच्या दृष्टीची कळीची संसाधने तगून आहेत. | अजूनही थोड्या-बहुत देवरायांत कुन्स्टलेरिया केरळेन्सिस सारख्या नव्या वनस्पति प्रजाति सापडत आहेत.