पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

A A A A A A A A A A देशातल्या अनेक भागात माकडे-वानरे-मोर बागडत आहेत. काळवीट-चिंकारा-विशेषतः नीलगायींची संख्या अनेक ठिकाणी वाढली आहे. चिंकारा-काळवीटांची चोरटी तस्करी पकडून देण्यात स्थानिक लोक पुढाकार घेत आहेत. राजस्थानात अनेक भागांत लोक “ओरण” जंगले संभाळून आहेत नागालँडमध्ये स्थानिक समाज निसर्गरक्षणात पुढाकार घेत आहेत. उत्तराखंडातल्या बनपंचायती अनेक ठिकाणी चांगले काम करत आहेत. पूर्वीचे निस्तार हक्क असलेल्या मध्य भारतातील अनेक भागांत लोक जंगल संभाळून आहेत. कर्नाटकातल्या हळकारचे ग्रामवन टिकून आहे. लोक रत्नागिरीतील खाजगी जंगले मोठ्या प्रमाणात संभाळून आहेत ओरिसात मोठ्या प्रमाणावर सामूहिक वन संरक्षणातून जंगलाचे पुनरुज्जीवन झाले आहे. हेही लक्षात ठेवण्याजोगे आहे की स्वित्झर्लंडची केवळ गेल्या दीडशे वर्षात फोफावलेली विपुल वनराजी सर्वतः गावसमाजांच्या मालकीची आहे. तेव्हां आता हा कायदा अमलात आला आहे. याबद्दल आपल्या काहीही शंका-कुशंका असतील तरी त्या क्षणभर बाजूला ठेऊन यातून काय चांगले निष्पन्न होऊ शकेल याचा सकारात्मक, रचनात्मक भूमिकेतून पाठपुरावा करायला पाहिजे. ह्या दृष्टीने चार पद्धतीचे कार्यक्रम आपण हाती घेऊ शकूः > सामूहिक वनभूमीवर वैविध्यपूर्ण आणि त्याबरोबरच लोकोपयोगी वनस्पतिसृष्टी उभी करणे > सामूहिक भूमीच्या ५-१० टक्के हिश्श्यांवर निसर्गरक्षणासाठी पूर्ण संरक्षण देणे-देवरायांच्या पद्धतीवर. > खाजगी मालकी दिल्या गेलेल्या वन जमिनीवर पिकांच्या पारंपारिक गावरान वाणांचे संगोपन करणे । > खाजगी मालकी दिल्या गेलेल्या वन जमिनीवर विविध वाणांच्या फळझाडांचे संगोपन करणे अखेर परिसर सुस्थितीत राखून खरा लाभ होतो स्थानिक लोकांना. आसमंताचे जतन, संगोपन करण्याची खरी कुवत असते स्थानिक लोकांपाशी. स्थानिक परिसराबद्दल व्यवस्थापनाला आवश्यक अशी बारकाव्याची माहिती पण असते स्थानिक लोकांपाशीच.