पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरपणावर, रानातील फळफळावळीवर, कंदमुळांवर अवलंबून असतात. हे सारे सांभाळून ठेवण्यात स्वतःचे हित आहे ह्याची त्यांना जाणीव असते. त्यांच्यापाशी वड-पिंपळ, देवराया, नीलगायी, मोर-वानरे यांना संरक्षण देण्याच्या परंपरा असतात. जेव्हा जेव्हा शक्य आहे, तेव्हा हेही लोक पर्यावरणाच्या संरक्षणात मोया आस्थेने भाग घेऊ शकतात. हे अनुभव लक्षात घेऊन पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे याबाबत एक वेगळी विचारसरणी भारतात मूळ धरू लागली होती. गांधीवाद्यांना सहज पटण्याजोगी होती आणि म्हणून ती चण्डीप्रसाद भट, सुंदरलाल बहुगुणा या सर्वोदयवाद्यांनी प्रथम उचलून धरली. दुस-या बाजूने लोकांबरोबर शास्त्रोक्त नियोजन करण्याच्या खटपटीतून केरळ शास्त्र साहित्य परिषदेसारख्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी, आणि अनिल अगरवाल, सुनीता नारायण सारख्या पत्रकारांनीही ती उचलून धरली. परंतु हे मान्य केलेच पाहिजे की आज लोकांच्या हातून सगळीकडे निसर्ग व्यवस्थित राखला, जोपासला जातो आहे, असे बिलकुलच नाही. इंग्रजी अंमलापासून लोकांचे निसर्ग संपत्तीवरचे सर्व हक्क हिरावून घेतले गेले आणि ही संपत्ती प्रथम परकीयांसाठी आणि नंतर आपल्या उद्योगधंद्यांसाठी, नागरी गरजांसाठी वापरली गेली. कागद गिरण्यांना बांबू दीड-दोन रुपये टन अशा कवडी मोलाने उपलब्ध करून देण्यात आला. याच वेळी बुरडांना हाच बांबू विकत घ्यायला टनाला दीड-दोन हजार रुपये खर्च करावे लागत होते. अशा उरफाट्या व्यवस्थेत लोकांची निसर्ग जपण्याची परंपरा लुप्त झाली आणि त्यांनीही अंदाधुंद वापर करून या ठेव्याचा विध्वंस केला. केवळ लोकांच्या मजबुरीतून होणारी नासाडी डोळ्यापुढे ठेवणारा, शासकीय यंत्रणेने केलेली प्रचंड नासधूस, अन्याय, भ्रष्टाचार विसरून, जे का रंजले-गांजले अशा लोकांना दोष देणारा, देशाच्या पर्यावरणवादातला प्रवाह श्रीमंत, इंग्रजी विद्याविभूषित लोकांच्यात कायम प्रभावी राहिला आहे. तळागाळातील जनता पर्यावरणाचे रक्षण करु शकेल हे त्यांना शक्यकोटीतले भासत नाही. लोकपराङ्मुख राहिलेली शासकीय यंत्रणा, विशेषतः वनविभाग व वन्यजीव विभागातील अधिकारी या विचारसरणीला जोरदार पाठिंबा देतात. हीच विचारसरणी वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडासारख्या सुशिक्षित मध्यमवर्गातील अनेक सदस्य असलेल्या संस्था मानून आहेत. भारतातील अनेक विख्यात पत्रकार, वकील, न्यायाधीशांनाही ही विचारधारा मान्य आहे. देशाच्या दुर्दैवाने ही विचारधारा मानणाच्या लोकांच्यात व ग्रामीण भागातील, वनप्रदेशातील जनतेत एक मोठी दरी आहे. ह्या दरीमुळेच नक्षलवाद्यांसारख्यांचा आतंकवाद पोसला जात आहे. निसर्गाधारित पर्यटनावर भरपूर पैसा कमावणाच्या लोकांनी या विचारधारेच्या निसर्गसंरक्षणवाद्यांचे नेतृत्व पटकावले आहे. भरतपूरची घोडचूक अशा रीतीने १९८० च्या दशकात निसर्गाधिष्ठित पर्यटन हे वनव्यवस्थेचे नवे ध्येय बनले. त्याबरोबरच अभयारण्यांचा, राष्ट्रीय उद्यानांचा विस्तार वाढू लागला आणि ह्या