पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याच प्रदेशात चिपको आंदोलनात प्रसिद्ध झालेली रेणी-लाटा गावे होती. त्या आंदोलनात पुढाकार घेणा-या महिला होत्या. या सा-यांवर मुद्दाम आकसाने बंधने आणून त्यांचे हाल करण्यात आले. ओरिसातील उत्साहवर्धक अनुभव | पण १९८० च्या दशकात काही सुचिन्हेही दिसू लागली. यातील महत्वाचे एक म्हणजे ओरिसात हजारो गावांनी आपली जंगले परत उभी करणे. ओरिसातील हे कार्यक्रम म्हणजे निसर्गाला अनुरूप व्यवस्थापन कसे करावे याची उत्तम उदाहरणे आहेत. निसर्गाचे सुव्यवस्थापन हे एका ठरीव, साचेबंद पद्धतीने कधीच शक्य नाही. कारण निसर्ग जागो-जाग, वेळो-वेळ बदलत राहतो. निसर्गाचे व मानव समाजाचे परस्परसंबंधही असेच स्थलकालाप्रमाणे भिन्न-भिन्न असतात. तेव्हां त्या, त्या परिस्थितीला अनुरूप, तिच्याशी मिळते घेऊन हे व्यवस्थापन करणेच उचित आहे. स्थानिक नैसर्गिक, सामाजिक बारकावे लक्षात घेऊन असे व्यवस्थापन केले पाहिजे. पश्चिम बंगालात संयुक्त वनव्यवस्थापनाची प्रणाली रुढ झाल्यावर, त्यापासून धडे घेऊन, ओरिसात हजारो जंगल सुरक्षा समित्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने स्थापन केल्या. ह्या करताना प्रत्येक समितीत कोण-कोणत्या गावांचे लोक असावेत, त्या समित्यांचे काम कसे चालवावे, जंगलाचे रक्षण, नियमबद्ध दोहन, निगराणी कशी करावी, ह्यासाठी कोणी किती श्रमदान किंवा आर्थिक सहाय्य करावे, ही पद्धत जरुरीप्रमाणे कशी बदलावी, हे सगळे स्थानिक तपशील विचारात घेऊन, परिस्थितीत कसे बदल होत आहेत यावर नजर ठेऊन, सतत देखरेख करत ठरवत गेले. यामुळे या समित्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. नयागड जिल्ह्यातील धानी पाच मौजा जंगल सुरक्षा समिती ही १९८७ साली स्थापन झालेली व ८४० हेक्टरचे जंगल राखणारी अशीच एक समिति आहे. या पाच गावांच्यात एकजुटीने काम करण्याची जुनी परंपरा होती. ज्या जंगलाची व्यवस्था पाहण्याची यांची कल्पना होती त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेली ही गावे होती, म्हणून त्यांनी आपणहून एकत्र येण्याचे ठरवले. ह्या उलट सरकारी साचेबंद योजनांत ग्रामपंचायत हा घटकच काम करेल असा आग्रह असतो. हा घटक अनेकदा नैसर्गिक, सामाजिक रचनेशी विसंगत असतो, व त्यामुळे अडचणी निर्माण होतात. या धानी पांच मौजा समितीने सर्व कुटुंबांतील प्रतिनिधींची सर्वसाधारण सभा ही अखेर सर्व निर्णय घेईल असे ठरवले. ही सभा वर्षातून एकदा भरेल, पण जरूर पडल्यास कितीही वेळा बोलावता येईल असा निर्णय घेतला. दैनंदिन व्यवस्थेसाठी एक कार्यकारी समिती, व तिच्या मदतीसाठी एक सल्लागार समिति नेमली. | आरंभी जंगल पार उजाड झाले होते; पण त्याच्यात फुटवे येऊन पुनरुज्जीवित होण्याची शक्ति होती, म्हणून अतिशय कडक पहाण्याची व्यवस्था केली. त्यासाठी दहाजण पाळीपाळीने जाऊ लागले. जसे जंगल पुन्हा वाढले, समितीला काजू व बांबूचे उत्पन्न