पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प | मिळावा, म्हणून चळवळ. त्यालााच पूरक म्हणजे वन जमिनीचा निसर्गाभिमुख व लोकाभिमुख वापर होत रहावा यासाठी आंदोलन. ह्या दुस-या प्रवाहातून महाराष्ट्रात १९८० साली “जंगल बचाव, मानव बचाव” परिषदा घेण्यात आल्या. ह्या वननिवासियांच्या परिषदांनी जंगलातील शेतीवरील मोकळ्या जागेत झाडांची लागवड करण्याची, तसेच सभोवतालच्या जंगलाचे रक्षण, पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे असे आग्रहाने प्रतिपादन केले. कर्नाटक पल्पवुड लि.” ह्या कंपनीच्या विरोधात लोकांनी हाती घेतलेला कार्यक्रम हा ह्या संदर्भातील एक उल्लेखनीय अनुभव आहे. ह्या उद्यमाला कर्नाटकातील ६ जिल्ह्यातील ३० हजार हेक्टर गायरान व इतर महसूल जमीन वनविभागाकडे हस्तांतर करून देण्यात आली, व त्यावर नीलगिरीची रोपवने लावायला सुरुवात केली गेली. अनेक गावांतून याला मोठा विरोध झाला व १९८९ साली ठिक-ठिकाणी लोकांनी नीलगिरी उपटून त्याजागी बोरे, फणस, कडूनिंब अशी झाडे लावली. आजतागायत ह्यातली अनेक लोकसहभागी रोपवने छान टिकून आहेत, वाढली आहेत. उदाहरणार्थ यातले हनगल तालुक्यातील कुसनूर गावाचे जंगल संयुक्त वनव्यवस्थापनाखाली अतिशय कार्यक्षम पद्धतीने जोपासले जात आहे. | ह्या लोकांच्या सुरात आता वनविभागाच्या कारवायांना इथवर पूर्ण पाठिंबा देणा-या शहरी, मध्यमवर्गियांचाही सूर मिसळू लागला. १९५२ साली भारतीय वन्यजीव मंडळ स्थापन झाले, तेव्हां निसर्गनिरीक्षणाची आवड, निसर्गरक्षणाची आच मध्यमवर्गात पसरली नव्हती. राजा-महाराजांखेरीज बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे काही उच्चभ्रू सदस्य मात्र ह्याचा विचार करत होते. ह्या निवडक लोकांत सुप्रसिद्ध पक्षितज्ञ सलीम अली व जवाहरलाल नेहरुंचाही समावेश होता. पण जसजसा शिक्षणाचा प्रसार झाला, मध्यमवर्ग वाढत गेला, तसतसे अनेक लोक निसर्गाकडे आकृष्ट झाले. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीसारख्या मर्यादित सदस्यत्वाच्या संस्थेच्या जागी वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडाची भारतीय शाखा कार्यरत झाली, त्यांनी देशभर सदस्य मिळवले, शहरोशहरी निसर्गमंडळी स्थापन केल्या. याबरोबरच मनोरंजनासाठी निसर्गाधारित पर्यटन फोफावले. ताडोबा, गीर, बंडीपूर, पेरियार, भरतपूर, सरिष्का, रणथंबोर, कान्हा अशा निसर्गरम्य स्थळांकडे लोकांचा ओघ सुरु झाला. वनविनाश मंडळे जेव्हां भारतभर वन विकास मंडळे प्रस्थापित होऊन जोरात नैसर्गिक जंगलांचा विध्वंस करु लागली, तेव्हां ह्या शहरी निसर्गप्रेमींना खटकायला लागले. त्यांचे मान्यवर नेते, डॉ. सलीम अली म्हणू लागले: अहो, ही वनविकास मंडळे नाहीत, तर वनविनाश मंडळे आहेत. इंदिरा गांधी त्यांच्या स्नेही होत्या. त्यांनीही प्रभावित होऊन १९८१ साली एका जाहीर सभेत ह्या “वन विनाश” मंडळांच्या कार्यपद्धतीचा पुनर्विचार करावा लागेल, असा उल्लेख केला.