पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राज्ये होती. साहित्य, कला, संस्कृति होती. याच्या जोडीलाच वन्य पशु पक्ष्यांचे वैपुल्य होते. अनेक निसर्गरम्य स्थळे त्यांनी सांस्कृतिक-धार्मिक श्रद्धेतून जतन करून ठेवली होती. गोव्यांनी बंदुकीच्या बळावर या साच्या संस्कृतीचा, समाजांचा, जीवसृष्टीचा नायनाट केला. माया समाजातील विद्वानांचे पुस्तक न पुस्तक हुडकून नष्ट केले, हरेक पंडिताची हत्या केली. तसेच उत्तर अमेरिकेतील कुरणांवर बागडणारे लक्षावधि बायसन-गोवंशातील पशू-नष्टप्राय केले. ह्या बायसनची बेफाम शिकार करताना इतके मांस मिळायचे की त्यातली सर्वात स्वादिष्ट म्हणून केवळ जीभ खाऊन बाकीचे कलेवर तसेच कुजत टाकून दिले जायचे. हे निसर्ग व मानवी जीवनाच्या विनाशाचे युगकर्म पूर्ण होत आल्यावर, आरंभानंतर तब्बल अडीच-तीनशे वर्षांनी, वसाहतवद्यांना निसर्ग रक्षणाच्या कल्पना सुचायला लागल्या. त्यातून यलोस्टोनसारखी राष्ट्रीय उद्याने निर्माण झाली. हे यलोस्टोन मूळ रेड इन्डियनांनी जतन केलेले निसर्गरम्य स्थळ होते. जेव्हां ते राष्ट्रीय उद्यान बनवले, तेव्हा तिथल्या जिवंत राहिलेल्या उरल्यासुरल्या मूलवासियांना हाकलून देऊन ते गोव्या हौशी पर्यटकांच्या मनोरंजनाचे स्थळ बनवण्याची त्यांची इच्छा होती. तेव्हां त्यांनी मांडणी केली की राष्ट्रीय उद्यानात मानवाचा हस्तक्षेप मुळीच नको. मूलवासी रेड इन्डियनांच्या शतकानुशतकांच्या हस्तक्षेपातूनच यलोस्टोन समूर्त झाले होते हे सोयिस्करपणे डोळ्याआड करून. ही अगदी चुकीची चौकट आपल्या लोकांना शत्रू ठरवणा-या वनविभागाच्या शासनाने व त्यांच्याबरोबर वन्यजीव संरक्षणाच्या कामात सहभागी झालेल्या राजे-महाराजांनी स्वीकारली. इंग्लंड-अमेरिकेकडे डोळे लावून बसलेल्या भारतीय सुशिक्षित, शहरी, मध्यमवर्गानेही हाच आदर्श मानला. हे आहे भारतात आज प्रभावी असलेल्या लोकविन्मुख पर्यावरणवादाचे मूळ. शिकार कंपन्या | भल्या थोरल्या खाजगी जंगल जमिनीचे मालक असलेल्या अनेक जमीनदारांच्या, राजांच्या मालमत्तेत वन्य प्राण्यांची हेवा करण्याजोगी संपत्ति होती. अशांपैकी एक होते जुनागडच्या नवाबाचे गीरचे जंगल. इंग्रजांनी भारतावर कब्जा केला तेव्हां नर्मदेच्या उत्तरेस मोया टापूत सिंह होते. त्यांच्या शिकारीचा खास शौक इंग्रजांना होता. जो जो इंग्रज राजा, यूक, लॉर्ड भारतात यायचा, त्याला सिंहाची शिकार करून एक मोठे मुंडके दिवाणखान्यात लावायची हौस होती. या शिरकाणातून हळू हळू संपत येऊन १९०० सालापर्यंत सिंह फक्त गीरच्या जंगलात शिल्लक राहिले. तेही संपले असते, पण अगदी १५-२० शिल्लक राहिल्यावर जुनागडच्या नवाबाने आपल्या इंग्रज सम्राटांना त्यांचा पूर्ण नायनाट झाला आहे असे खोटेनाटे सांगून ते वाचवले. दुसरे असेच वन्यजीवांचे सुप्रसिद्ध भांडार होते. राजस्थानातल्या भरतपूरच्या महाराजाच्या मालकीचे केवलादेव घनाचे सरोवर. हे उथळ सरोवर १७६३ साली एक बांध घालून शेतीला पाणी पुरवठ्यासाठी बनवले होते. पण त्या तळ्यात अक्षरशः अगणित