पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जिल्ह्यातल्या दांडेलीला खोलली गेली. तिने आपल्या पोटावर पाय आणले अशी कर्नाटकाच्या बुरुडांनी तक्रार केल्यावर काय झाले याची चौकशी करायला मला सांगण्यात आले, तेव्हा समजलेली नमुनेदार कहाणी भारतातल्या जंगलांचा कसा विध्वंस होत होता हे दाखवून देते. | ही गिरणी १९५८ साली सुरु करताना कारवार जिल्ह्यात भरपूर बांबू आहे, तो या गिरणीला शाश्वत रूपे पुरेल असे सांगण्यात आले. पण हा बांबू पहिल्या दशकातच खतम झाला. हे कसे पाहता आढळून आले की कारखान्याच्या स्थापनेच्या वेळी बांबूच्या उपलब्धीचे भरमसाठ आकडे पुरवले होते. प्रत्यक्ष पहाणीनुसार ते दहा पट फुगवलेले आढळले. याउप्पर गिरणीचे बांबू तोडणेही अनेकदा आत्यंतिक व नियमबाह्य होते. वर कागद गिरणीने कायदा स्वतः हातात घेऊन जंगलांना काटेरी कुंपण घालून, स्वतःचे रखवालदार ठेऊन स्थानिक लोकांच्या हक्कांची पायमल्ली केली होती आणि बाजारात बांबू पंधराशे रुपये टन विकला जात असताना गिरणी सरकारला भरत होती याचा फक्त हजारावा हिस्सा- दीड रुपये टन. शिवाय गिरणीने काळी नदीचे पाणी, एवढेच नव्हे तर भूजलही प्रदूषित केले होते, त्याचीही किंमत लोकांनाच द्यावी लागत होती. एवंच, असा फुकट मिळालेला कच्चा माल अद्वातद्वा वापरून प्रत्येक कागदगिरणीने, प्रत्येक प्लायवुडच्या गिरणीने सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापण्याच्या शैलीत भराभर खालसा केला. कागद गिरणीचे अनेक अधिकारी माझे मित्र झाले होते. मी त्यांना तुमचा कच्चा माल संपुष्टात येतो आहे, याची तुम्हाला काळजी वाटत नाही का, असे विचारले. तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितले. आम्ही कागद बनवण्याचा व्यवसाय करत नाही, आम्ही मग्न आहोत पैसा कमावण्यात. कागद गिरणीच्या पहिल्या दहा वर्षातल्या नफ्यातून आमचा पैसा पुरा वसूल झाल आहे. आता बांबू संपला तर दुसरे पर्याय शोधू. जरूर पडली तर कागद गिरणी बंद करून पैसा मैंगनीजच्या खाणीत नाही तर दुस-या काही उद्योगात गुंतवू. पाश्चात्यांचे अंधानुकरण १९५२ च्या वननीतीत वन्य जीवांच्या रक्षणाचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. त्यानंतर लवकरच भारतीय वन्यजीव मंडळ स्थापन करण्यात आले. शिकारीचा शौक असलेल्या राजे-महाराजांना निश्चितच वन्य प्राण्यांची जाण होती, त्यांच्याबद्दल आस्था होती. त्यांनी या नव्या उपक्रमात पुढाकार घेतला. वर उल्लेखिल्याप्रमाणे म्हैसूरचे महाराज स्वतंत्र भारताच्या वन्य जीव मंडळाचे पहिले अध्यक्ष बनले. वन्य जीव मंडळाने व वनखात्याने वन्य जीव संरक्षणाची जी नवी चौकट बसवायला सुरुवात केली तिच्यात भारताच्या वन्यजीव संरक्षणाच्या परंपरांकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले. सारी पद्धति अमेरिकेच्या राष्ट्रीय उद्यानांच्या आदर्शावर बसवली गेली. अमेरिकेत गोच्या लोकांनी प्रथम पाऊल ठेवले, तेव्हा तेथे सायबेरियातून आलेले रेड इंडियन मूलवासी निदान दहा हजार वर्षे रहात होते. त्यांची मोठ-मोठी माया-इन्कांसारखी