पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होते. तसेच या वननीतीत प्रथमच वन्य जीवांच्या संरक्षणासाठी अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने राखण्यात यावीत, यासाठी आवश्यक ते कायदे करण्यात यावेत हे मांडण्यात आले. याच्या जोडीनेच असेही म्हटले आहे की: वरील गोष्टी करताना वार्षिक महसूल वाढेल व भविष्यातही तो सतत वाढता राहील अशी व्यवस्था करण्याची गरज आहे. जमीनदारी जंगल इंग्रजांच्या जमान्यात शेतसारा हे सरकारचे महत्वाचे उत्पन्न होते. ते शक्य तेवढ्या कमी खर्चात शक्य तेवढे जास्त गोळा करणे ह्यावर सरकारी धोरणाचा भर होता. ह्याची सोय व्हावी म्हणून देशाच्या अनेक भागांत इंग्रज सरकारने संस्थानिक, जागिरदार, इनामदार, जमिनदार निर्माण केले होते. त्यांच्या क्षेत्रातले शेतकरी त्यांची कुळे होते, त्यांच्याकडून वर्षाला शेती उत्पन्नातला मोठा हिस्सा घेऊन, इंग्रज सरकारला काही ठराविक शेतसारा भरणे ही त्यांची जबाबदारी होती. देशाच्या सुमारे ११% क्षेत्रात असे खाजगी जमीनदारी मालकीचे जंगल होते असा एक अंदाज आहे. यातले अनेक जमीनदार, राजे-महाराजे, शिकारीचे मोठे शौकीन होते. यांच्यातील म्हैसूरचे महाराज १९५२ साली भारताच्या पहिल्या वन्य जीव मंडळाचे अध्यक्ष बनले. भारतातल्या पर्यावरणवादावर ह्या वर्गाचा मोठा प्रभाव आजपर्यंत टिकून आहे. समाजवादाच्या गप्पा मारणा-या सरकारला प्रचंड जमिनदारी खालसा करून कसणा-याला जमीन मालक बनवणे आवश्यक होते, खाजगी जंगले सरकारच्या ताब्यात घेऊन वनविभागाच्या मालमत्तेत भर घालण्याची जरुरी होती. पण हे जमीनदार सत्ताधारी वर्गाचा एक घटक होते. तेव्हां हे परिवर्तन खंबीरपणे करणे शक्यच नव्हते. ढिलेपणे, जमीनदारांचा शक्य तेवढा फायदा होऊ देत, व त्या बरोबरच या फायद्यातला काही हिस्सा खिशात घालत होईल हे अटळ होते. याची सुरुवात झाली १९५० च्या दशकातील जमिनदारी खालसा करण्याच्या कायद्यांतून. वनखात्याच्या हातात होते त्याच्या साधारण निम्मा हिस्सा हे खाजगी जंगल त्या खात्याकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरु झाली. ह्यातील मोठा हिस्सा उत्तम स्थितीत होता, त्याचे संरक्षण पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्वाचे होते. पण घ पणे, तातडीने काहीही केले गेले नाही. या जंगलाची पाहणी करून, त्यांचे हस्तांतर होण्याचे काम वर्षानुवर्षे नव्हे, अक्षरशः दशकानुदशके रेंगाळत राहिले. या काळात जमिनदारांनी यातील बहुतेक जंगल जमिनदोस्त केले. स्वातंत्र्याचा उषःकाल झाल्यावर लवकरच भारतभूतल्या मोठ्या वनप्रदेशावर अशी काळरात्र उगवली. नेत्यांच्यानोकरशाहीच्या दिरंगाईतून-भ्रष्टाचारातून. वनाधारित उद्योग आधुनिक भारताच्या औद्योगिक विकासासाठी जी काय किंमत मोजावी लागणार ती मुकाट्याने चुकवलीच पाहिजे अशी धारणा स्वातंत्र्यानंतर पहिली एक पिढी - १९७२७३ पर्यंत पाय घ रोवून होती. या काळात इतर उद्योगांबरोबरच वनाधारित उद्योगही मोया प्रमाणात उभारले गेले. यात होत्या कागद, प्लायवुड गिरण्या. त्यातली एक कारवार