पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वातंत्र्योत्तर विकासनीति स्वातंत्र्य मिळाले. विकासाची दिशा काय असावी याची चर्चा सुरु झाली. महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्याच्या आजूबाजूच्या निसर्गाशी संतुलन सांभाळणा-या, स्वयंपूर्ण शेतीप्रधान समाजाच्या कल्पना बाजूला सारल्या गेल्या. मानवाने आपल्या गरजा अवास्तव भडकू देऊ नयेत, निसर्गाचे दोहन काळजीपूर्वक करावे हे महात्मा गांधींचे जीवन विषयक तत्वज्ञानही अमान्य करण्यात आले. समाजवादी समाजरचनेतून झपाट्याने औद्योगिक प्रगतिपथावर वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू झाला. वैज्ञानिक वनव्यवस्थापनात जितका विज्ञानाचा अंश होता, तथाकथित चिरस्थायी वनव्यवस्थापनात जितका टिकाऊपणा होता, तितकाच ह्या समाजवादात ख-याखु-या सामाजिक, आर्थिक समतेचा पाठपुरावा करण्याचा इरादा होता. ह्या बेगडी समाजवादाचा अर्थ होता, लोकांच्या पैशाने, लोकांच्या जमिनी बळकावून, लोकांना निसर्गापासून आणखीच दूर ढकलून ही सारी संसाधने सत्तेवर आता कब्जा केलेल्या वर्गांना अगदी स्वस्तात उपलब्ध करून देणे. यातून नैसर्गिक संसाधनांच्या वापराची जी एक पद्धत बसवली गेली तिला राज्यशास्त्रात नाव दिले आहे, “आयर्न ट्रायँगल”, आपण मराठीत म्हणू शकू दुष्ट त्रिकूट. ह्या त्रिकूटाचे तीन घटक आहेत: पहिले म्हणजे लाभ लुटणारेः उद्योगपति, सधन शेतकरी, आणि संघटित क्षेत्रातील नोकरदार; दुसरे म्हणजे ह्या सर्व व्यवस्थेबद्दल निर्णय घेणारे राजकारणी, आणि तिसरे म्हणजे ही व्यवस्था अंमलात आणणारी नोकरशाही. ह्यांच्या हातमिळवणीतून नैसर्गिक संसाधने सत्ताधारी वर्गाच्या वेगवेगळ्या घटकांना प्रचंड सवलती देऊन पुरवण्याची व्यवस्था केली गेली. ह्या गैरव्यवस्थेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे निसर्गसंपत्तीची नासाडी. ह्याचे दुष्परिणाम शेवटी सगळ्यांनाच भोगावे लागणार, पण सत्ताधारी वर्ग बन्याच प्रमाणात आपला बचाव करून घेतात. दुष्परिणाम ताबडतोब भोगायला लागतात बहुजनांना; ग्रामीण भागातील भूमिहीनांना व अल्प भूधारकांना, मच्छिमारांना, पशुपालकांना, बुरुडकाम करणा-यांना, आदिवासींना, व यातूनच उठून शहरांत येऊन झोपडपट्ट्यांत राहणा-या जनतेला. | ह्या त्रिकूटाच्या कार्यनीतीचे एक उदाहरण म्हणून पुण्याजळच्या पानशेत धरणाची कहाणी बघू या. स्वातंत्र्यानंतर शहरांना, शेतीला पाणी पुरवण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी धरणे बांधण्याचा सपाटा सुरु झाला. या धरणांना पंडित नेहरुंनी आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे मानले. ही देवळे बांधली जात होती, डोंगराळ, वृक्षाच्छादित प्रदेशात. या धरणांच्या निमित्ताने तेथे पहिले रस्ते बांधले गेले. अशातले हे पानशेत धरण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारे भरपूर पावसाचे पाणी गोळा करून पुणे शहराला व शहराच्या पूर्वेला पर्जन्यछायेच्या प्रदेशात उसाच्या मळेवाल्यांना, सहकारी साखर कारखाने पळवणाच्या राजकारण्यांना पुरवते. त्या अगोदर पानशेत धरणाच्या खाली गेलेल्या मोशे नदीच्या खोच्यात आणि त्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या डोंगर उतारांवर स्थानिक शेतक-यांच्या मालकीच्या जमिनी होत्या. नदीच्या चिंचोळ्या खो-यात ते भातशेती करायचे, आणि डोंगर