पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ढवळाढवळ करत राहिले. या प्रतिकूल परिस्थितीतही अनेक बन पंचायतींनी जंगल खूप सुस्थितीत राखले. इंग्रजांच्या काळात जंगलाचा व्यापारी उपयोग मुख्यतः बोटी बांधण्यासाठी, तोफांच्या गाड्यांसाठी, रेल्वेमार्गावरील स्लीपर्ससाठी, रेल्वे इंजिनात लाकडी कोळसा जाळण्यासाठी, इमारतींसाठी करण्यात येत होता. भारतात कसलेच उद्योगधंदे उभारू देण्यास इंग्रजांचा विरोध होता. यात कागदासारख्या वनाधारित उद्योगांचाही समावेश होता. परंतु पहिल्या महायुद्धात जर्मन पाणबुड्यांनी इंग्रजी समुद्र वाहतुकीची कोंडी केल्यानंतर भारतातही काही उद्योगधंदे चालू करायची जरुरी आहे असे इंग्रजांना भासू लागले. यातून भारतातली पहिली कागदगिरणी सुरु झाली बंगालात. पहिल्या महायुद्धानंतर वीस वर्षाची कशी बशी उसंत मिळाली, आणि दुसरे महायुद्ध पेटले. पुन्हा एकदा युद्धाला लाकूड पुरवण्यासाठी अंदाधुंद जंगलतोड सुरु झाली, ती जवळजवळ स्वातंत्र्यापर्यंत. ग्रामस्वराज्याची संकल्पना भारतीय संस्कृतीत, विशेषतः ग्रामीण जीवनात बांबूचे स्थान अतुलनीय आहे. पाळण्यापासून तिरडीपर्यंत बांबूचा वापर सार्वत्रिक आहे. शेतीची अवजारे, टोपल्या, सुपे, घराच्या तट्ट्या, दारे, खिडक्या, लेखणी, बासरी असे नानाविध उपयोग आहेत. बुरुड, कैकाडी आणि अनेक दलित जातींतील लोक बांबूच्या विणकामातून पोट भरतात. अर्थात् इंग्रज पूर्व कालात तो मोफत मिळायचा. १८६० साली इंग्रजांनी कारवारच्या जंगलातून बांबू न्यायला बुरुडांकडून टनामागे ५ रुपये वसूल करायला सुरुवात केली. त्यावेळची रुपयाची किंमत पाहता हा बुरुड-कैकाड्यांवर मोठाच बोजा होता. याबरोबरच वनविभागाने सुरवात केली बांबू-आवळा-बोरे-मोह-हिरडा-कोकमांनी नटलेल्या जंगलांना सफ़ाचट करून सागवानाची लागवड करायाला. या वेळच्या कार्य आयोजनांत बांबू हे तण आहे, त्याचे निर्मूलन करावे असे सांगण्यात आले होते. ब-याच भागात, विशेषतः जिथे जास्त पाऊस होता, तिथे ही सागवानाची रोपवने तग धरू शकली नाहीत. अशा प्रदेशात जो साग होता, तो फिरती शेतीमुळे. हे न समजल्याने वनविभागाने अनेक जंगलांची मोठी नासधूस केली गेली. ग्रामीण जनतेला या सर्व व्यवस्थापनातून काहीही लाभ नव्हता, आणि व्हावा असा अजिबात विचारही नव्हता. ही जनता जंगलाचे वैरी आहेत अशीच मांडणी वनविभागाच्या प्रत्येक दस्तावेजात केली गेली. हीच भावना जंगल खात्याच्या सेवकांच्या मनात बळकट केली गेली. महात्मा फुल्यांप्रमाणेच महात्मा गांधींनाही ही वननीती पूर्ण नापसंत होती. त्यांच्या ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेत जंगले पुन्हा लोकांच्या हातात देऊन त्यांच्या शेतीचा, उपजीविकेचा आधार झाली पाहिजेत असे प्रतिपादन होते. स्वातंत्र्यापूर्वी कॉन्ग्रेसने ते मानलेही होते. पण स्वातंत्र्यानंतर वचनभंग केला. लोक जंगलाचे वैरी हा जुनाट दृष्टिकोन कायम राहिला.