पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अशा परीक्षणांचे व्यवस्थित संकलन करून देशभर खरोखरच चिरस्थायी पद्धतीने वनोपयोग चालला आहे की नाही हे पाहणे हे वनसंशोधन संस्थेचे कर्तव्य होते. त्यांनी जर हे केले असते, तर स्पष्ट झाले असते की असे काहीही चाललेले नाही. पण आजतागायत असा एकही अधिकृत अभ्यास केला गेलेला नाही. याला एक अपवाद आहे. तो म्हणजे डॉ. सी. टी. एस. नायर नावाच्या वनाधिका-यांनी केरळातल्या क्विलॉन विभागाच्या वनेतिहासाचे एफ. ए. ओ. तर्फे केलेले विश्लेषण. | ० ० ० яиц ० ० ० ० ० ० ० 110) १ । ܘ 449