पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाद झालाः वनखात्याच्या ताब्यात ६.९ कोटी हेक्टर जमीन आहे का ७.५ कोटी हेक्टर? हेही आकडे नक्की ठाऊक नव्हते. आता या ताब्यातल्या जमिनीवर किती प्रमाणात झाडे आहेत? १९८०च्या सुमारास जेव्हां उपग्रहाचे चित्र उपलब्ध झाले, तेव्हां अंतरिक्ष विभागाने भारत भूमीवर किती प्रमाणात वृक्षाच्छादन आहे याचा स्वतंत्रपणे अंदाज वर्तवला. तोवर वनखाते भारतातील २३% जमीन वृक्षाच्छादित आहे असे दावे करत होते; पण ते सपशेल चुकीचे होते, प्रत्यक्षात वृक्षाच्छादन केवळ १४% आहे असे आढळून आले. वैज्ञानिक वनव्यवस्थापनासाठी आवश्यक अशा माहितीसंकलनाचा एक आधार म्हणजे झाडांच्या वेगवेगळ्या जाती-प्रजातींच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी एकोणिसाव्या शतकापासून राखून ठेवलेल्या अभ्यासवाटिका. यांच्यात दर पाच-दहा वर्षांनी काळजीपूर्वक मोजमाप करून वेगवेगळ्या गोलाईच्या भिन्न जाती-प्रजातींची नोंद ठेवावी व त्याआधारे झाडे किती मोठी झाल्यावर तोडावी हे नीट ठरवावे असा उद्देश आहे. परंतु वनविभागाने अशी माहिती नोंदवणे केव्हांच सोडून दिलेले आहे, आणि अशा बहुतांश अभ्यासवाटिका केव्हांच तोडून टाकल्या आहेत असा अहवाल डेहराडूनच्या वनसंशोधन संस्थेने स्वतःच प्रकाशित केला आहे. तसेच बस्तर चीड रोपवन समितीला आढळून आले की प्रायोगिक रूपाने उष्ण कटिबंधीय चीडचे जे रोपवन बस्तरमध्ये लावले होते व ज्याच्या आधारावर ही जात बस्तरमध्ये चांगली फोफावेल असे प्रतिपादन केले जात होते, ते रोपवन धड अस्तित्वातच नव्हते. | अगदी अलीकडे सरिष्का अभयारण्यात वाघ आहेत की नाहीत यावर वाद झाला, तेव्हां जे सरकारी आकडे प्रसृत करण्यात येत होते, ते सपशेल चुकीचे आहेत असे सिद्ध झाले. या संदर्भात पंतप्रधानांनी एक चौकशी समिती नेमली होती. त्या समितीला अरण्य रक्षकांच्या नोंदी पहायला मिळाल्या. या नोंदींतून स्पष्ट झाले की प्रत्यक्ष काम करणा-यांना वाघ नष्ट झाले हे माहीत होते, तरी वरचे अधिकारी धादांत खोटे बोलत राहिले होते. तक्ता अः सरिष्का व्याघ्र प्रकल्पातर्फे वाघांच्या संख्येचे अधिकृत रीत्या पुरवलेले आकडे व दैनंदिन निरीक्षणावरून गार्डोंनी नोंदवलेले अंदाज १९९८ ९९ २००० ०१ | ०२:०३ ०४ अधिकृत गणती २४ २६ २६ २६ २७ २६ १७ | ० गाईंचा अंदाज १७ ६ । ३