पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वनस्पतींच्या वन्य भाईबंदांचे सर्वश्रेष्ठ आगर मानले जाते. इथे आहेत हळद, अळू, सुरणांशी जवळीक असलेली कंदमुळे, भातासारख्या धान्यांच्या, वालांसारख्या कडधान्यांच्या गोतावळ्यातल्या वनस्पति, घोळ माठांचे भाईबंद असणा-या कित्येक पालेभाज्या, काल्र्याच्या नात्यातल्या फळभाज्या. इथल्या जंगलात रानकेळी आहेत, बोरी, आवळे, जांभूळ, आंबे आहेत, फणस आहेत, कोकम, करवंदे, तोरणांसारखी रुचकर फळे आहेत. मोह तर आदिवासींचा कल्पवृक्ष आहे. आपल्या रानांत कढीपत्ता, मिरी, दालचिनीसारखे मसाले आहेत. लोक पावसाळा सुरु होताच मोया हौशीने खातात अशी अळिंबे आहेत. राम-लक्ष्मण-सीतामाईंनी वनवासात हाच रानचा मेवा खात गुजराण केली होती असे रामायणात वर्णन आहे ना! पण इंग्रजांना हा सारा रानचा मेवा टाकाऊ वाटत होता. लोकांचे ह्या मेव्यावरचे प्रेम आपल्या आरमारासाठी, रेल्वेसाठी, शहरातल्या इमारतींसाठी लाकूड वाढवण्यातला एक अडसर वाटत होता. तेव्हा त्यांनी नवे कायदे करून लोकांचे पूर्वापारचे उदरनिर्वाहाचे अनेक मार्ग गुन्हेगारीत समाविष्ट केले. स्वतः केली वन्य प्राण्यांची बेबंद शिकार आणि अरण्यानीला बनवले राज्यकर्त्यांसाठी लाकूड पुरवणारी दासी. विज्ञानाचे विडंबन असे हे भारताची सारी अरण्यभूमि वैविध्यहीन आणि लोकांना पूर्ण निरुपयोगी बनवू पाहणरे वनव्यवस्थापन वैज्ञानिक असण्याचे इंग्रज करत असलेले दावे हे शुद्ध थोतांड होते. विज्ञानाची एक उत्तम व्याख्या आहे. विज्ञान हा एक शंकेखोरपणाचा संघटित प्रयत्न आहे, ते एक संशयकल्लोळ नाटक आहे! आपल्या भारतीय परंपरेत म्हटले आहेः "संशयात्मा विनश्यति”. याच्या अगदी उलट विज्ञान बजावते "संशयमेव जयते!" विज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. कोणाचीही अधिकारवाणी न मानणे, सगळी विधाने, अनुमाने तपासायला सर्वांना पुरी मोकळीक देणे. विज्ञान एकच प्रमाण मानते, ते म्हणजे वास्तवाचे. वस्तुस्थिति काय आहे याची माहिती व्यवस्थित संकलित करून त्याच्या आधारावर अनुमाने बांधणे, ही अनुमाने बरोबर आहेत का नाहीत हे जाहीरपणे पडताळणे, ती तपासायला सा-यांना उत्तेजन देणे, व काही चुका झाल्या असल्यास त्या ताबडतोब समजावून घेऊन नवी माहिती गोळा करणे, नवी अनुमाने बांधणे ही विज्ञानाची कार्यपद्धति आहे. तथाकथित वैज्ञानिक वन व्यवस्थापनेत याचा लवलेशही नाही. वन व्यवस्थापनासाठी जी वास्तवाची माहिती हवी, ती अतिशय तुटपुंज्या प्रमाणात आहे. मुद्दामच जेव्हा १८६५ मध्ये पहिले वनविधेयक बनवले, तेव्हा वनाची स्पष्ट व्याख्या करूच नये असा निर्णय घेण्यात आला. परिणामी “वन” म्हणजे काय हे सुद्धा अजून गोंधळात आहे. साध्या भाषेत वन म्हणजे वृक्षराजी. पण सरकारी हिशोबात वन म्हणजे वन खात्याच्या ताब्यातील जमीन, मग त्यावर झाडे सोडाच, गवताचे पान सुद्धा नसले तरी चालेल. पण वन खात्याच्या ताब्यात किती जमीन आहे हे सुद्धा स्पष्ट नाही. १९६५ सालच्या सुमारास एक