पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नावाच्या गावक-यांनी तर १९७२ साली आमच्या मार्फत खास विनंति करुन आपल्या गावची काळकाईची १० हेक्टरची राई वाचवली. त्यावेळी या राईत गावच्या ओढ्याचा उगम आहे, ती राई तुटल्यास ओढा आटेल; हे होऊ नये म्हणून ही राई वाचवायला हवी, असे त्यांनी बोलून दाखवले. म्हणूनच आजच्या धर्माचा संदर्भ पूर्ण बदलेल्या परिस्थितीतही ही परंपरा नुसती टिकूनच नाही, तर काही ठिकाणी पुनरुज्जीवित होत आहे. मणिपूर-मिझोराममध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यावर तिथले देवरायांचे प्रचंड जाळे जीर्ण-शीर्ण झाले. कारण याच सुमारास तेथे रस्ते-टूका पोचून लाकडाला मोठी मागणी उत्पन्न झाली होती. परंतु देवराया तुटण्याचे तोटे मग अनेक ठिकाणी लोकांच्या डोळ्यात भरले. उदाहरणार्थ मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील गांगटे लोकांच्या गावांत यामुळे फिरत्या शेतीवर पेटवलेल्या आगी पसरून घरे जळण्याची भीति वाटायला लागली. तेव्हां गांगटे लोकांनी काही गावात पूर्वीप्रमाणे देवराईचे एक कडबोळ्यासारखे वलय पुनरुज्जीवित केले. आता ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्याने त्यांनी या देवराईला ‘सुरक्षावन’ असे वेगळे नांव दिले आहे, परंतु सामाजिकरीत्या ही बंधने पाळण्याची जी पूर्वी पध्दत होती तीच अंमलात आणली आहे. अजूनही ह्या देवराया जैवविविधतेचे संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. केरळाच्या किनारपीत दाट लोकवस्ती आहे, व तेथील नैसर्गिक वनराजी जवळ जवळ पूर्णपणे नष्ट झाली आहे. तरीही अशा नैसर्गिक वनराजीचे काही अवशेष शेतांतून विखुरलेल्या देवराया अथवा सर्पकावूत सापडतात. अशाच एका देवराईत वनस्पतिशास्त्रज्ञांना कुन्स्टलेरिया केरळेन्सिस ही एक नवी प्रजाति सापडली. तसेच डिप्टेरोकार्पस इंडिकसचे उदाहरण बघा. ह्या कुळातील सदाहरित वृक्ष वर्षावनांत फोफावतात. हे प्रचंड आकाराचे, मऊ लाकडाचे वृक्ष प्लायवुड बनवण्याला उत्तम कच्चा माल आहेत. स्वातंत्र्यानंतर जेव्हां प्लायवुडच्या गिरण्या भारतात भराभर वाढल्या तेव्हां त्यांनी एका मागून एक त्यांना लाभदायक जातीचे वृक्ष संपवायचा सपाटा लावला. वन विभागानेही त्यांना हव्या त्या जाती-प्रजाती त्या नष्टप्राय होईपर्यंत उपलब्ध करून देणेआणि अगदी स्वस्तात-सुरू केले. जरी सारखे जंगलांचा टिकाऊ पद्धतीने वापर केला पाहिजे, नाही करतच आहोत, असे सोंग घेतले होते तरी. प्रत्यक्षात ओळीने एका मागून एक प्लायवुड गिरण्यांना हव्या त्या जाती संपून जात राहिल्या. ह्यात कर्नाटकात प्रथम संपली डिप्टेरोकार्पस इंडिकस. आज या राज्यात त्याचे भले मोठे वृक्ष केवळ एका राईत शिल्लक आहेत; लोकांनी जतन केलेल्या “करीकानम्मन मने” अथवा “किर्र रानाच्या आईचे घर” नावाच्या होन्नावर जवळच्या देवराईत.। निसर्ग-यंत्रणेचे ज्ञान जमिनीत ज्यांची पाळेमुळे घ' आहेत अशा भारतवासियांपाशी निसर्गाची यंत्रणा कशी चालते याचे भरपूर ज्ञानही पूर्वापारपासून आहे. बिळि-गिरि-रंगन-बे I या म्हैसूर