पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकांच्या वनव्यवस्थापनाबद्दल फारच तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे. ईस्ट इंडिया कंपनीने हळू हळू कब्जा सुरु केल्यापासून या संस्था मोडण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा सपाटा चालू ठेवला, त्यामुळे आज त्यांच्याबद्दल फारसे सांगणे अवघड आहे. पण याला थोडे अपवाद आहेत. उदाहरणार्थ, १९२२ साली कारवार जिल्ह्यातील लोकांच्या वनविभागाविरुद्धच्या गा-हाण्यांची चौकशी करणाच्या कॉलिन्स नावाच्या इंग्रज अधिका-याने तीन गावांचा मुद्दाम उल्लेख केला आहे: हळकार, मुरूर-कल्लब्बे व चित्रगी. या तीन गावांनी पूर्वीपासून आपापल्या गावांचे जंगल उत्तम राखून ठेवले आहे, आणि भविष्यात गाव समाजांनी वनव्यवस्थापन कसे करावे यांचा आदर्श घालून दिला आहे असे त्या अहवालात म्हटले आहे. मध्य भारतात लोकांना वन प्रदेशावर निस्तार हक्क देण्यात आले होते, आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जंगले सुस्थितीत सांभाळण्यात आली होती. राजस्थानातही प्रचंड प्रमाणात “ओरण” नावाची ग्रामवने जमिनदारी खालसा होईपर्यंत चांगली राखली गेली होती. गोव्यात पोर्तुगीज अंमलाखाली गावकीची-तथाकथित कुमिन्दाद-वने सुस्थितीत होती. नागालँडमध्ये आज तागायत अनेक ग्राम समाजांनी वनसंपत्तीची चांगली जोपासना केली आहे. वनाप्रमाणे वन्य जीवांचेही पारंपारिक व्यवस्थापन संयमी व शिस्तबद्ध असावे असे वाटते. पावसाळा सुरू होता-होता जे पहिले पूर येतात, त्यावेळी अनेक जातींचे मासे नदी- ओढ्यांत प्रवाहाविरुद्ध पोहत जाऊन अंडी घालतात. अशा चढणीवरच्या माशांना पकडू नये असा रिवाज अनेक ठिकाणी प्रचलित होता. वन्य पशूची शिकार करतानाही काळजी घेतली जायची. उदाहरणार्थ, फासे- पारधी जाळ्यात सापडलेल्या हरणांच्या गाभण माद्यांना सोडून देत असत. निसर्गरक्षणाच्या परंपरा निसर्गरक्षणाच्या अनेक चांगल्या परंपरा भारतीय संस्कृतीचे भूषण आहेत. आपल्या देशभर वड-पिंपळ-उंबर-नांदुची झाडे विखुरलेली आहेत. यांना पवित्र मानून संरक्षण देण्यात आलेले आहे. आज परिसर शास्त्रज्ञांच्या लेखी ह्या सर्व वृक्षजाती “कळीची संसाधने" मानण्यात आली आहेत. इतर झाडा-झुडपांना जेव्हा काहीही फळे नसतात, अशा दिवसांतसुद्धा ह्या जाती फळतात. ह्यांच्या फळांवर अनेक किडे, पक्षी, माकडे, खारी, वटवाघळे तग धरून राहतात. म्हणून निसर्गरक्षणाच्या दृष्टीने ह्यांना टिकवणे महत्वाचे अशी विज्ञानाची शिकवण आहे. हे शहाणपण पूर्वीपासून आपल्या लोकपंरपरेत आहे. | मध्य प्रदेशातल्या शिवणी जिल्ह्यातल्या छपारा ब्लॉक मधल्या तेरा गोंड आदिवासी गावांच्या आसपासच्या जंगलात भरपूर चारोळी पिकते. पण एकमेकांवर विश्वास नसला, सहकार नसला, की लोक फळ वाढता वाढताच ओरबाडतात. पुरेसे मोठे होऊ देत नाहीत. कारण थांबले तर दुसरे कोणी तरी ते तोडेल ना! २००४ साली ह्या तेरा गावांतले लोक संयुक्त वनव्यवस्थापनासाठी एकत्र आले, तेव्हा त्यांनी ठरवले की सगळ्यांनीच संयम बाळगून चारोळी व्यवस्थित पिकू द्यायची. गोंडांच्या परंपरेप्रमाणे चारोळी पुरी वाढल्यावर