पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/254

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शेतकरी आणि सहकार



 हकारी संस्थांविषयी बोलताना काव्याचा वापर भरपूर केला तो. 'विना सहकार नही उद्धार' अशा प्रकारच्या काव्यपंक्ती उद्धृत केल्या जातात. कोणा एका पुढाऱ्याने तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सहकारी संस्था स्वतःच्या किंवा आपल्या पुठ्यातील लोकांच्या ताब्यात ठेवल्या तर त्याला सहकार महर्षीची पदवी प्राप्त होते. कोणत्या सहकारी संस्थेत कुणाला कसे निवडून आणावे हे एक शास्त्र आहे. या शास्त्रात पारंगत असलेल्यांना सहकारसम्राट म्हटले जाते.
 खरे म्हटले तर सहकार ही कोणताही व्यवसाय चालविण्याची एक पद्धती आहे. कोणताही धंदा चालवायचा असला तर तो एकट्याचा खाजगी धंदा म्हणून चालवता येतो, भागीदारीत चालवता येतो, मर्यादित जबाबदारीची खाजगी कंपनी काढून करता येतो किंवा व्यवसाय जास्त व्यापक स्वरुपाचा असेल तर आणि भांडवलाची गरज जास्त असेल तर मर्यादित जबाबदारीची सार्वजनिक कंपनीसुद्धा काढली जाते. अशा कंपन्यांच्या प्रमुखांना उद्योगमहर्षी वगैरेसुद्धा फारसे म्हटले जात नाही. त्या कारखानदाराच्या साठाव्या, सत्तराव्या वाढदिवशी एखादा वक्ता कदाचित अशी विशेषणे वापरतो; पण ती कुणी फारशी गंभीरपणे घेत नाही आणि अमुक अमुक कारखानदार 'प्रायव्हेट लिमिटेड महर्षी' आहे किंवा ‘पब्लिक लिमिटेड सम्राट' आहे अशीही भाषा कधी ऐकू येत नाही.

 'सहकारी चळवळ' हा शब्दप्रयोगही असाच गमतीचा आहे. औद्योगिकीकरणाची चळवळ असू शकते, व्यापार वाढविण्याची चळवळ होऊ शकते; पण पब्लिक लिमिटेड कंपन्यांची चळवळ किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांची चळवळ असली भाषा कधी ऐकू येत नाही. या संस्थांप्रमाणेच

बळिचे राज्य येणार आहे / २५६