पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होत असतानासुद्धा शेकडो-हजारो लोक तुरुंगात गेले तरी शेतकऱ्यांनी शांतता सोडली नाही. शेतकऱ्यांचा हा गुण की अवगुण ?
 ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता यापुढे शेतकरी आंदोलन किंवा सज्जन आंदोलन, सभ्य आंदोलन, कायदेभंगाचे आंदोलन अशा आंदोलनाला काही भविष्य आहे की नाही? का ज्यांना हातामध्ये शस्त्र घ्यायची हिंमत नाही त्यांनी आता घरी जाऊन स्वस्थ बसावे आणि जी काही भाकरी चटणी समोर येईल तेवढी खाऊन समाधानी राहावे आणि ज्यांच्या हातामध्ये बंदुका घेण्याची ताकद आहे तेच यापुढे देशाचे राजकारण आणि दिशा ठरवणार असे झाले आहे काय?

(शेतकरी संघटक, २१ नोव्हेंबर १९९०)

बळिचे राज्य येणार आहे / १५६