पान:बलसागर (Balsagar).pdf/94

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न करायला हवा.
 आसाम हा तर अंदमानप्रमाणे मूळ भूमीपासून अलग नसलेला, भारताचा अविभाज्य भाग आहे. तरीपण सांस्कृतिक-धार्मिकदृष्ट्या तो भारताशी समरस न झाल्याने, राजकीय, आर्थिकदृष्ट्याही तो तुटलेला व दुर्लक्षित राहिला. काश्मिर वाचवण्यासाठी पं. नेहरूंनी किती आटापिटा केला ? आजही काश्मिरशी आपली अस्मिता जोडली गेलेली आहे. पण काश्मिरपेक्षा दसपट मोठा व महत्त्वाचा असलेला आसाम मात्र शत्रूच्या घशात चाललेला असताना, आपण, आपले सरकार निद्रिस्त राहिलो. कारण आसामचे उर्वरित भारताशी सांस्कृतिक-धार्मिक पातळीवर असे संबंधच आजवर कमी आले.
 आपली यात्रेची ठिकाणे सगळी उत्तरप्रदेशातली, हिमालयातली. दक्षिणेकेडचे रामेश्वर-कन्याकुमारीही आपल्याला जवळचे वाटते. पण शतकानुशतके जेथे भारतीय यात्रेकरू जाताहेत, असे एकही यात्रास्थान आसामात नाही. म्हणून आसाम भारतात राहिला काय, शतूने बळकावला काय किंवा फुटून तो अलग झाला काय, भारतीयांना याचे सुखदुःख आज तरी सारखेच आहे.
 चीनी आक्रमणाच्या वेळी आसामवर पाणी सोडायची नेहरूंनी तयारी ठेवली नव्हती का ?
 अशीच स्थिती उद्या अंदमान-निकोबार बेटांची होणार नाही कशावरून ?
 म्हणून सर्व भारतीयांचे अंदमान हे एक नवे यात्रास्थान व्हायला हवे.

 सर्वप्रथम जेथे स्वातंत्र्य अवतरले, १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीच जो भारतीय भूभाग सर्वप्रथम स्वतंत्र झाला, ती ही समुद्रवलयांकित भूमी. १८५७ पासूनच्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे, भारत स्वतंत्र व्हावा म्हणून सशस्त्र मार्गाचा अवलंब करणाच्या सहस्रावधी क्रांतिकारकांचे हे तपस्थान. पं. नेहरूंनी स्वातंत्र्य मिळाल्यावर म्हटले होते की, भाक्रानानगल हीच आपली नवी तीर्थक्षेत्रे व्हायला हवीत. पण अजून तरी तसे काही झालेले दिसत नाही. दिसणारही नाही. साबरमतीचा आश्रम तीर्थाचे ठिकाण म्हणून लोक मानतील. जेथे पं. नेहरुंना व इतर काँग्रेसनत्याना डांबून ठेवले होते, तो अहमदनगरचा किल्लाही यात्रास्थान ठरू शकेल. कारण देशासाठी केलेल्या त्यागाची ही प्रतीके आहेत. अंदमान हे सर्वोच्च प्रतीक, काग्रेसवाल्यांनी खोटा इतिहास जनतेच्या गळी उतरवण्याचा गेल्या ५०-६० वर्षे कतीही प्रयत्न केला असला, तरी आपले स्वातंत्र्य केवळ अहिंसेने मिळालेले नाही हे सत्य आता लोकांना हळहळू पटत चालले आहे. क्रांतिकारकांच्या त्यागकथा, याचे शौर्य आणि हौतात्म्य यांच्या गाथा घरोघर पोचत आहेत, जनतेच्या अंत:करणात त्यांच्याविषयी आदर आणि भक्तिभाव फुलत आहे. राजकर्त्यांनी कितीही

।। बलसागर ।। ९३