पान:बलसागर (Balsagar).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 जन्मशताब्दी : एका आधुनिक चार्वाकाची

 

 पुण्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात संरक्षणतज्ज्ञांचे एक चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात आसाममधील अस्थिरतेकडे लोकांचे लक्ष वेधण्यात आले. पाकिस्तान आणि चीन या बाह्य शत्रूपासून जेवढा धोका आपल्याला आहे, त्यापेक्षाही आसाम आणि लगतच्या राज्यांतील अस्थिरतेमुळे निर्माण होणारा धोका जास्त गंभीर आहे, असा इशाराही या चर्चासत्रात संरक्षणतज्ज्ञांनी दिलेला आहे.
 याच संदर्भात, चर्चासत्रात अशी माहिती देण्यात आली की, इंडोनेशियाच्या शालेय पाठ्यपुस्तकात अंदमान-निकोबार ही बेटे इंडोनेशियाची आहेत असे दाखवले जाते. भारत सरकारने याबद्दल आक्षेप घेतला आहे, अशी काही माहिती मात्र चर्चासत्रात पुढे आली नाही.
 उद्या फॉकलंडप्रमाणे काही वाद निर्माण झाला आणि युद्ध भडकले तर आपली बाजू आपण कशी सिद्ध करणार आहोत ?
 मूर बेटाबाबतचा वाद गेल्याच वर्षी बांगलादेशाने माजवला होता !
 इंडोनेशिया असे काही करणारच नाही याची शाश्वती काय ? सबंध बंगालचा उपसागर आपलाच आहे, असा दावा मलेशियाचे पंतप्रधान टुंंकु अब्दुल रेहमान यांनी पूर्वीच करून ठेवलेला आहे.

 तेव्हा अंदमान-निकोबार व इतर बेटे यांचे भारताशी असलेले नाते यापुढे केवळ राजकीय-संरक्षणात्मक पातळीवर किंवा आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न ठेवता, सांस्कृतिकदृष्ट्या हा भाग आपण भारताच्या, भारतीय जन-

।। बलसागर ॥ ९२