दडपले तरी सत्य, आज नाही उद्या, मान्यता पावल्याशिवाय कसे राहील ?
पाेर्टब्लेअर दि. २८ मे १९८२
अंदमान-निकोबार द्वीपसमूहाची राजधानी पोर्टब्लेअर येथे सावरकर जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने सेल्युलर जेलच्या १२३ क्र. कोठडीतील सावरकरांच्या प्रतिमेला अध्यक्ष श्री. लक्ष्मण सिंह (भू. पू. संसदसदस्य), उपाध्यक्ष श्रीमती जयदेवी व सचिव श्री. गोविंदराव हर्षे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून वर्षभराच्या होणा-या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम पोर्टब्लेअर स्थित सेल्युलर जेलमध्ये सकाळी ९ वा. संपन्न झाला.
श्री. पंडित (मानव विज्ञान विभागाचे डायरेक्टर), पी. टी. आयः चे श्री. मुजुमदार, लाईट ऑफ अंदमान या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक श्री. परशुराम, श्री. शरदचंद्र गुप्ते, विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती श्री. नागभूषण, शासनाच्या वतीने श्री. आर. एस. बाली (सचिव, समाजकल्याण विभाग) इत्यादी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती.
त्याच दिवशी सायंकाळो, शिक्षक प्रशिक्षण संस्थानच्या सभागृहात समितीच्या वतीने एक सभा आयोजित करण्यात आली. सभेची सुरुवात सावरकररचित 'जयोस्तुते श्री महन्मंगले' व 'सागरा प्राण तळमळला' या कवितांच्या हिंदी अनुवादाच्या सुस्वर पाठाने सौ. फाले यांनी केली.
अध्यक्षांच्या स्वागतानंतर स्थानीय कवी व कवयित्रीद्वारा सावरकरांच्या जीवनावर स्वरचित कविता-वाचन झाले. त्यानंतर समितीचे सचिव श्री. हर्षे वर्षभराच्या कार्यक्रमाची रुपरेखा सांगताना म्हणाले, 'जन्मशताब्दी समारोहाच्या अनुषंगाने वर्षभरात वक्तृत्वस्पर्धा, निबंधलेखनस्पर्धा, कवितावाचन (स्वरचित), चित्रकलास्पर्धा इत्यादी उपक्रम बाल, कुमार व कॉलेज विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात येतील.'
तदनंतर स्वातंत्र्यसैनिक श्री. बॅनर्जीनी सावरकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. श्री. पंडित आपल्या भाषणात म्हणाले, 'आपल्या जीवनसर्वस्वाचा होम करणा-या सावरकरांनी ज्या चेतनेने प्रेरित होऊन देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण कुटुंबाची आहुती दिली, ती प्रेरणा, ती चेतना आज लुप्त झाली आहे. त्या चेतनेचे पुननिर्माण हेच खरे कार्य ठरेल.'
श्री. शरदचंद्र गुप्ते आपल्या भाषणात म्हणाले, 'सावरकर केवळ स्वातंत्र्यसैनिकच नव्हते, तर एक समाजसुधारक होते.' रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना