पान:बलसागर (Balsagar).pdf/91

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणण्यात काय गैर आहे ? मुंबई महाराष्ट्राची म्हणजेच मराठी जनतेची आहे, असे म्हटल्यावर गुजराथ्यांनी किंवा इतरांनी मुंबईत राहू नये, मुंबई सोडून निघून जावे, असा अर्थ निघत नाही. तसेच हा देश बहुसंख्यांक या न्यायाने हिंदूंचा आहे, असे म्हटल्यावर, मुसलमानांनी, ख्रिश्चनांनी किंवा इतरांनी हद्दपार व्हावे, असा अर्थ त्यातून निघत नाही, निघू नये. तसा तो मुद्दाम काढला जात आहे. यामागे 'हिंदू' या शब्दाविषयीचा द्वेष याशिवाय दुसरे-तिसरे कुठलेही कारण नाही. तो जुना असल्याने जायला थोडा वेळ लागेल. तोवर मुंबईवर मराठी जनतेचा हक्क सांगून, हिंदुस्थानवर हिदंचा हक्क नाकारण्यातला विनोद आणि विसंगती आपल्याला सहन करीत राहिलेच पाहिजे !

 २० मार्चच्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेतर्फे प्रचारासाठी बिल्ले काढण्यात आलेले आहेत. 'आम्ही भारतीय आहोत, भारतीयत्वाचा आम्हाला अभिमान आहे,' असे त्यावर लिहिलेले आहे. कुणीही असा प्रश्न विचारेल की, 'बाबांनो ! या भारतीयत्वाची तरी व्याख्या काय ?' जी व्याख्या हिंदूची, हिंदुत्वानी, तीच व्याख्या शेवटी भारतीयत्वाची करावी लागते. भारतात केवळ एकत्र राहिलेल कुणी भारतीय ठरत नाही. दीडशे वर्षे इंग्रज येथे राहिले. काहींचा जन्मही भारतात झाला असेल ! मग ब्रिटिशांना आपण भारतीय म्हणणार का ? आसामात चार-चार पिढ्या स्थायिक झालेले पाकिस्तानी-बांगलादेशीय आहेत. का त्यांना परकीय ठरवून हाकलून लावायचे ? कारण एकच. ते जरी भारतात राहत असले तरी भारतीय परंपरा ही आपली परंपरा आहे. असे ते मानत नाहीत भारतीय कोण ? जो आसेतुहिमालय पसरलेल्या भूमीला आपली भूमी मानता । व्यास–वाल्मिकींपासून टिळक-गांधींपर्यंत चालत आलेल्या परंपरेचा जो स्वत:ला वारस समजतो, या परंपरेबद्दल योग्य तो डोळस अभिमान बाळगतो, तो भारतीय हाच राष्ट्रवादाचा आशय सावरकरांनी 'पितृभू' आणि ' पुण्यभू' हे दोन शबवापरून सुटसुटीतपणे व्यक्त केलेला आहे. परंपरेचा काही भाग चांगला अस काही वाईट व टाकाऊ असेल; पण राष्ट्रवाद एकदा मान्य केला की, परपर घटकत्व मान्य करावेच लागते आणि आजतागायतची भारतीय परंपरा ही मूल आणि मुख्यतः हिंदू परंपरा आहे, हेही नाकारून चालत नाही ! म्हणून हिट्स भारतीय हे दोन्ही शब्द समानार्थाने वापरण्याचा रा. स्व. संघाचा पर्यायच सद्यस्थितीत योग्य आहे. जोवर हिंदू या शब्दाबद्दल आकस आहे, जाणूनबुजून शब्दाचा द्वेष केला जात आहे, तोवर केवळ 'भारतीय' या शब्दाचा स्वाक करणे धोकादायक आहे. हिंदी राष्ट्रवाद पूर्वी जसा रुजला नाही, तसेच हिंदुत्वा द्वेषावर उभा राहू पाहणारा हा आत्मविद्रोही भारतीय राष्ट्रवादही येथे रुजणार

॥ बलसागर ।। ९०