पान:बलसागर (Balsagar).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. कारण त्याचा पाय च ठिसूळ राहील. केवळ प्रादेशिक तत्त्वावर कुठलाच राष्ट्रवाद कुठेच आजवर तरी उभा राहिलेला नाही !


 डावी मंडळी राष्ट्रवादाकडे वळत असतील तर हे एक बरे लक्षणच आहे; पण मार्क्सवादी-समाजवादी तत्त्वज्ञानात राष्ट्रवादाला स्थान नाही, हेही ध्यानात ठेवायला हवे. राष्ट्रवादाचा खाजगी मालकीशी जवळचा संबंध आहे. मध्यमवर्गीयांचे हे तत्त्वज्ञान ! कामगारवर्ग हा आंतरराष्ट्रवादीय असायला हवा ! मार्क्सवादी-समाजवादी मंडळींनी स्वत:ला भारतीय म्हणवून घेणे, भारतीयत्वाबद्दल अभिमान वगैरे बाळगणे, हाही एक संकुचितपणाच आहे. हिंदू हे विश्ववादाकडे चालले असता, मार्क्स-लेनिनला भारतीयत्वात कोंडणे, हे पाऊल पुढचे' की मागचे ?


मार्च १९८२

॥ बलसागर ॥ ९१