करांचा, संघाचा किंवा हेडगेवारांचा जन्मही झालेला नव्हता ! पाकिस्तानची कल्पनाही तेव्हा अस्तित्वात नव्हती. अलीगड विद्यापीठ नव्हते. उलट या देशात जो पिढ्यानुपिढ्या राहतो, इथल्या संस्कृतीचा जो स्वत:ला घटक मानतो तो सारा समाज म्हणजे हिंदू समाज, अशीच इथली सर्वसाधारण लोकभावना होती. शेवटचा मोगल बादशहा बहादुरशहा जफर जेव्हा इंग्रजांना उद्देशून आपला सुप्रसिद्ध शेर लिहितो. तेव्हा तो तेग हिंदोस्ताँनकी' अशीच शब्दरचना करतो, हिदीस्तान म्हणत नाही. शिवाजीचे 'हिंदवी स्वराज्य' आणि बहादुरशहा जफरचे 'हिंदोस्ताँ' या दोन्हीतून व्यक्त होणारी भावना एकच होती. ती म्हणजे या भूमीविषयी, इथल्या परंपरेविषयी, संस्कृतीविषयी ममत्वाची भावना ! 'हिंदू' हा शब्द काँग्रेसच्या जन्मापूर्वी या व्यापक व सर्वसमावेशक अर्थानेच वापरला जात होता, हे जोगळेकरांसारख्या हिंदुत्वाभ्यासकांनी आता पुरेसे सिद्ध केलेले आहे. अलीगडचे संस्थापक सय्यद अहमद खान यांचे एक उदाहरण तर फारच बोलके आहे. 'हिस्टरी ऑफ दि फ्रीडम मुव्हमेंट इन इंडिया' या आपल्या ग्रंथमालेच्या दुसऱ्या खंडात (पृ. ३५८) हे उदाहरण डॉ. ताराचंद यांनीच नोंदवलेले आहे. डॉ. ताराचंद लिहितात, : "सय्यद अहमद खान यांनी आपल्याला हिंदू का समजण्यात येऊ नये याबद्दल पंजाबमधल्या एका हिंदूंच्या सभेत तक्रार केली. ते म्हणाले की, 'तुम्ही स्वत:पुरता हिंदू शब्दाचा उपयोग केला आहे हे बरोबर नाही. कारण माझ्या मते (म्हणजे सय्यद अहमद खान यांच्या मते) हिंदू शब्दाने विशिष्ट असा संप्रदाय दर्शविला जात नाही. उलट हिंदुस्थानात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार आहे. मला वाईट वाटते की, मी हिंदुस्थानात राहत असूनही तुम्ही मला हिंदू समजत नाही." हिंदू म्हणजे एतद्देशीय परंपरेविषयी ममत्व असणारा माणूस. इथल्या संस्कृतीचा आपल्याला घटक समजणारा समाज, तो हिंदू समाज. अशी जर ममत्वाची, घटकत्वाची भावना नसेल तर समाजाचे राष्ट्रात रूपांतर होणे कठीण असते. जगात बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादाची निर्मिती अशी परंपरेतील एकत्वाच्या, ममत्वाच्या सातत्याच्या घटकांवर आधारित असलेली आपल्याला दिसते.
विस्कळित हिंदू समाजाचे एकात्म हिंदुराष्ट्रात रूपांतर होणे परकीय सत्ताधा-यांना अर्थातच धोकादायक वाटू लागले. म्हणून एकात्मतेचे खच्चीकरण सुरू झाले. मुसलमानांना हिंदूपासून प्रथम अलग पाडले गेले. जे सय्यद अहमद खान 'मला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार आहे' असे म्हणत होते, तेच अलिगढ विद्यापीठाच्या स्थापनेकडे वळले, वेगळेपणा जोपासू लागले. दुसरा प्रवाह होता तो समाजसुधारकांचा. हिंदु समाजातील काही दुष्ट चालीरीतींविरुद्ध या सुधारकांनी एकीकडे चळवळी जरूर केल्या; पण या चळवळी करताना दुष्ट