पान:बलसागर (Balsagar).pdf/88

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 हिंदुत्व । भारतीयत्व

 

 १८६७ मध्ये, म्हणजे सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये ‘हिंदू मेळा' नावाची संस्था स्थापन झाली. या मेळ्याच्या चौथ्या अधिवेशनानंतर म्हणजे १८७१ मध्ये नॅशनल सोसायटी' नावाची संस्था स्थापन करण्यात आली. हिंदू समाजात ऐक्य नि राष्ट्रीय वृत्ती यांचा परिपोष व्हावा हे या संस्थेचे ध्येय होते. तिच्यातर्फे दर महिन्यास एक व्याख्यान आयोजित केले जात असे. या व्याख्यानाच्या सत्रात एकदा राजनारायण बोस यांचे व्याख्यान झाले. त्यात हिंदू धर्माच्या श्रेष्ठतेवर त्यांनी भर दिला होता. या व्याख्यानानंतर एक वाद सुरू झाला आणि ख्रिश्चन लोक आणि ब्राह्मोसमाजी लोक यांनी सभा घेऊन श्री. बोस यांच्या मताला विरोध केला. मेळाव्याचा आवाका हिंदू समाजापुरता मर्यादित असल्याने 'राष्ट्रीय' शब्दाच्या वापराला या लोकांकडून आक्षेप घेण्यात आला. तेव्हा हिंदू मेळ्याचे मुखपत्र 'नॅशनल पेपर' याने त्या आक्षेपाला पुढील उत्तर दिले--

 'आमच्या पत्रलेखकाने हिंदूविरुद्ध का आक्षेप घ्यावा हे आम्हाला समजत नाही. कारण हिंदू हे स्वतः राष्ट्र आहेत. तेव्हा या राष्ट्रीय समाजाने स्थापन केलेल्या संस्थेला राष्ट्रीय म्हणणे योग्यच आहे.'
 हिंदुत्व विचाराचे सुप्रसिद्ध अभ्यासक श्री. ज. द. जोगळेकर यांनी नोंदवलेल्या वरील माहितीवरून असे दिसते की, हिंदुराष्ट्रवाद हा जुनाच आहे आणि त्यावरील आक्षेपही जुनेच आहेत. आक्षेप घेणा-या मंडळींचे गट व काळ बदलला असला तरी आक्षेपकांची प्रवृत्तीही तीच आहे. वरील वाद झाला तेव्हा सावर-

।। बलसागर ।। ८७