पान:बलसागर (Balsagar).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर संघाची किंवा जनता पक्षाची राजवट कधीच नव्हती. त्यामुळे तेथील पोलीसदल पूर्ण निधर्मी असण्यास काहीच हरकत नाही. शिवाय डाव्या कम्युनिस्टांचे व मुस्लिम लीगचे केरळातील परस्पर नातेसंबंध विख्यात आहेत. मोपल्यांच्या बंडाला स्वातंत्र्याचा उठाव समजून, त्यात भाग घेतलेल्यांना मानपत्रे वगैरे देण्यातही नंबुद्रि पादांना कधीच संकोच वाटलेला नव्हता ! केरळातली मुस्लिम लीग वेगळी आहे, असे प्रशस्तीपत्र इंदिरा गांधींनीही दिलेले आहेच. असे सगळे केरळातील वातावरण निधार्मिक व पुरोगामी असतानाही येथल्या पोलीसदलावर मुस्लिमांनी हल्ला का करावा ?
 मोरादाबादमध्ये डुकरामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, त्यामुळे मुस्लिम जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला.
 मल्लापुरममध्ये तर डुक्कर कुठे भावना दुखवायला आलेले नव्हते ! ज्यांच्या गळ्यात गळा घालून मुस्लिमांनी केरळात सत्तेचा खेळ केला त्या माक्र्सवादी नयनार सरकारचे पोलीसदल तर मुस्लिमविरोधी असण्याची शक्यता नव्हती ! बरं, प्रश्नही तसा मामुली. जुनाट धर्मशिक्षण देणाच्या काही शाळा किंवा वर्ग फार तर बंद पडले असते, जुन्या पद्धतीने शिकवणाया काही उर्दू-अरेबिक शिक्षकांवर काही काळ घरी बसण्याची पाळी आली असती. थंड डोक्याने विचार करून यावर तोडगा शोधून काढणे अशवय नव्हते; पण त्यासाठी एकदम पोलिसांवर हल्ला काय, सरकारी सामानाची लुटालूट, जाळपोळ काय, ३-४ जणांचा मृत्यू काय, नयनार सरकारची मृत्यूघंटा वाजवणे काय-सगळाच माथेफिरूपणा ! मोरादाबाद असो, मल्लापुरम असो, राजवट जनताची असो, कम्युनिस्टांची असो, काँग्रेसवाल्यांची असो. माथेफिरूपणात बदल नाही.

 भारतसरकारचे संकल्पित निधर्मी शांतता दल म्हणजे या माथेफिरूपणाला दिलेली एक मान्यताच आहे. आपल्या देशभरच्या सर्व पोलीसदलांवर, राखीव दलांवर, सैन्यदलांवर आपलाच विश्वास नाही, याची ही एक लाजिरवाणी कबुलीच आहे. दंगलींचा बंदोबस्त करताना या दलांपैकी जे कुणी पक्षपात किंवा धार्मिक भेदभाव करताना आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली, त्यांना धाक वाटेल अशा शिक्षा दिल्या गेल्या तर कुणीही हे आक्षेपार्ह मानणार नाही. अशी कडक उपाययोजना व्हायलाही हवी. सेक्युलॅरिझमचा आपल्या संदर्भात हा आणि एवढाच अर्थ आहे. वेगवेगळेपणाची भावना जोपासणे म्हणजे सेक्युलॅरिझम नव्हे. हा ब्रिटिश वारसा आहे व तो काँग्रेस सरकारने जसाच्या तसा उचलला आहे. ब्रिटिशांनी लावलेली, काँग्रेसने वाढवलेली ही अलगपणाची विषवल्ली आता इतर पक्षातही फोफावू पाहत आहे. सात-आठ कोटी मुस्लिमांचा, पाच-सहा

।। बलसागर ।। ७८