पान:बलसागर (Balsagar).pdf/80

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोटी इतर अल्पसंख्याकांचा प्रश्न या पद्धतीने सोडवायचा म्हटले तर हिंदुस्थानच काय आशिया खंडही अपुरा पडेल ! आज या सर्वांच्या हितरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस दल मागितले गेले, दिलेही गेले. उद्या स्वतंत्र सैन्यदलाची मागणी होईल, परवा स्वतंत्र राजधानी आणि पंतप्रधानही का नको ?
 जोवर ' इंडिया दॅट इज भारत' ही काँग्रेसी दृष्टी आहे तोवर ही अलगपणाची भावना वाढतच जाणार आहे.
 निदान “ भारत दॅट इज इंडिया' एवढे तर म्हणायला लागा !

सप्टेंबर १९८०

।। बलसागर ।। ७९