पान:बलसागर (Balsagar).pdf/77

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 
 मोरादाबाद आणि मल्लापुरम्

 

 जातीय दंगलींना तोंड देण्यासाठी भारत सरकार आता एका खास निधर्मी संयुक्त शांतता दलाची स्थापना करणार आहे. या दलाच्या तीन बटालियन्स उभारण्यास सरकारने संमती दिली आहे व मुख्यत्वेकरून या दलात अल्पसंख्यांक जमातीचे, तसेच वर्गीकृत जाती व जमातींचे लोक घेण्यात येतील असही यासंबंधीच्या वार्तेत म्हटलेले आहे. (पहा-महाराष्ट्र टाइम्स, शनिवार १३ सप्टेंबर १९८० अंक, पृष्ठ १)


 जुलै ३०. केरळातील मुस्लिम बहुसंख्या असलेला मल्लापुरम जिल्हा. इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या युवक शाखेने केरळभर जिल्हाधिका-याच्या कचेऱ्यांसमोर योजलेल्या निरोधनांच्या (Picketing) कार्यक्रमानुसार येथेही कार्यक्रम सुरू आहे. सुमारे सहा हजारांचा मुस्लिम जमाव. कार्यक्रम निरोधनाचा असला तरी जमावापैकी काहींजवळ शस्त्रे होती. निरोधनाचे निदर्शनात रूपांतर झाले व शेवटी पोलीस व जमाव यांच्यात चकमक उडाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन निदर्शक ठार झाले. एक पोलीसही मरण पावला. ' According to the Kerala Home Minister, the demonstrators carried weapons, made an unprovoked attack on the police and killed one policeman on the spot...' असे मुकूंंदन सी. मेनन यांनी, 'इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली' या मुंबईहून निघणा-या, डाव्या साप्ताहिकातल्या ३० ऑगस्टच्या अंकात यासंबंधी जे वार्तापत्र लिहिले आहे त्यात म्हटले आहे. या चकमकीत किमान ४० जण जखमी झाले. त्यात १५ पोलीस आहेत. जमावा-

।। बलसागर ।। ७६