पान:बलसागर (Balsagar).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळे झाले नाही तर पाकिस्तान मोडूनही आपल्याला फायदा शून्यच ! उलट बाहेरचे दुखणे घरात घुसण्याचा धोका अधिक. तो टाळायचा असेल आणि खैबरपर्यंतच्या क्षेत्रावर भारताचा प्रभाव प्रस्थापित करायचा असेल, तर प्रथम सामाजिक पातळीवर एकात्मता व अखंडता कशी निर्माण होईल, हे पाहिले पाहिजे. भारतातच आज छोटी-मोठी पाकिस्ताने, ख्रिस्तीस्ताने निर्माण होऊ पाहत आहेत. त्यांचा बीमोड होऊन सारा भारतीय समाज एकसंध आणि अनुशासनशील झाला तर अखंड भारत व्हायला कितीसा वेळ लागणार आहे ? केवळ आणखी एखादे भारत-पाक युद्ध झाल्याने किंवा त्यातील जयपराजयाने हे साध्य होणार नाही. समाजाचे एकात्मीकरण प्रथम झाले पाहिजे. प्रदेशांचे नंतर आपोआप नाही तरी अल्पशा प्रयत्नांनी होऊ शकते. गोवा नाही का भारतात विलीन झाला ? पण तत्पूर्वी तेथील आणि येथील जनतेत तशी जागृती निर्माण करण्याच्या कार्यास अधिक जोमाने वाहून घेणे हीच भाव्यांसारख्या हिंदुत्ववादी साहित्यिकाला खरी श्रद्धांजली ठरेल !
 भाव्यांनी सहदेवाला अग्नी आणण्यास सांगितले होते.
 उद्याचे नवे हिंदुत्ववादी त्या अग्नीची प्रार्थना करतील.
 म्हणतील-

'अग्ने नय राये सुपथान अस्मान्'

 ‘हे अग्ने, आम्हाला प्रगतीच्या, समृद्धीच्या मार्गाने घेऊन जा...'

ऑगस्ट १९८०

।। बलसागर ।। ७५