पान:बलसागर (Balsagar).pdf/72

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असंतोष, हे वाढते अराजक आणि ही फुटीरता कशी कमी होणार ? दडपादडपी हा एक मार्ग. आणीबाणीत या मार्गाचे पर्यवसान होते. दुसरा मार्ग युद्धाचा. युद्धामुळे महागाई वाढली तरी बेकारी कमी होते, पडून राहिलेले मालाचे साठे मोकळे होतात व आर्थिक अरिष्टातून तात्पुरती सुटका लाभते. तिसरा मार्ग विकासाचा; पण यासाठी समाजवादी धर्तीचा ठोस कार्यक्रम, राष्ट्रीय चारित्य आणि सामाजिक शिस्त हवी. या गोष्टींचा आज पूर्ण अभाव असल्याने पहिल्या दोन मार्गाचा अवलंब होण्याची शक्यताच आपल्या बाबतीत अधिक आहे.

 इंदिरा गांधींच्या समर्थकांनी या दिशेने आपल्या लेखण्या वेळवायला सुरू - वातही केली आहे. गिरिलाल जैन इंदिरा गांधींच्या राजकारणामागील तात्त्विक बाजू नेहमी आपल्या लिखाणातून पुढे ठेवीत असतात . ' Zia provokes Indira' अशा भडक मथळयाचा त्यांचा लेख टाइम्स रविवार पुरवणीत (दि. १० ऑगस्ट १९८०) प्रसिद्ध झालेला आहे, तो या दृष्टीने पुरेसा सूचक आहे. किंबहुना टाइम्स पुरवणीचे हे सगळे पान च सूचक व बोलके आहे. पानाच्या वरच्या भागात जैन यांचा वरील लेख आहे तर खालच्या भागात तारीक अली या प्रसिद्ध डाव्या नेत्याच्या ‘Will Pakistan survive' या लेखाची योजना करण्यात आलेली आहे. तारीक अली हे सध्या लंडनमध्ये असतात. पाकिस्तानातून त्यांना हद्दपार करण्यात आलेले आहे. त्यांनी खास टाइम्ससाठी हा लेख लिहावा व टाइम्सनेही या लेखाला गिरिलाल जैन यांच्या लेखासोबतच जागा द्यावी, हा केवळ योगायोग मानणे कठीण आहे. It is no longer premature to ask whether the policy of befriending Pakistan has run into trouble.' असे जैन यांच्या लेखावरची टीप सांगते, तर तारीक अलींचे म्हणणे असे की ' The question now is not whether but how long Pakistan can survive...' म्हणजे जैन यांनी सांगायच की, जनरल झिया आता कुरापती काढू लागलेला आहे, भारत-पाक मैत्रीपर्वाचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि तारीक अलींनी पुस्ती जोडायची की, नाही तरी पाकिस्तान आता किती दिवस टिकणार आहे ? जैन-तारीकअली ही जोडी प्रयत्नपूर्वक जमवण्यात आली असण्याचीच शक्यता अधिक आहे आणि वारे कुठल्या दिशेने वाहू लागले आहेत हे त्यावरून पुरेसे स्पष्टही होत आहे. तारीक अलींचे म्हणणे तर असे की, काबुलपर्यंत आलेल्या सोव्हिएट सैन्याने आणखी पुढे मुसंडी मारून, पाकिस्तानला झियांच्या लष्करी मगरमिठीतून सोडवले तर बरेच होईल, असे मानणारा वर्गही पाकिस्तानात संख्येने कमी नाही. सिंध-बलुचिस्थानमधील उठावांचीही त्यांनी भलावणच केलेली आहे. या सगळ्यांचा

।। बलसागर ।। ७१