पान:बलसागर (Balsagar).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 
 खैबर

 


 इंदिरा गांधींनी अलीकडेच केलेल्या दोन घोषणा मोठ्या सूचक आहेत. वृत्तपत्रांनी व राजकीय निरीक्षकांनी–निदान मराठीतल्या तरी त्यांची दखल घेतलेली मात्र दिसली नाही.
 पहिली घोषणा अणुस्फोटासंबंधीची. गरज पडली तर भारत अणुस्फोट करण्यास, म्हणजेच अणुबाँब बनविण्यास मागेपुढे पाहणार नाही असे बाई म्हणाल्या. यापाठोपाठ बाईंनी पाकिस्तानला असेही सांगून टाकले की, काश्मिरचा प्रश्न उकरून काढणे म्हणजे सिमला काराराचा भंग होय. या दोन्ही घोषणा एकत्र केल्या तर असा समज होतो की, चालू दशकातले भारत-पाक युद्ध जवळ जवळ येत चालले आहे काय ?
 युद्धाची ठिणगी उडालीच तर आसामप्रश्नाचे लोढणे नको म्हणून अचानक दोन्ही बाजूंनी थोडीथोडी माघार घेऊन वाटाघाटींना सुरुवात तर केली नसावी ?
 बँ. अंतुले यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली, यामागेही हा व्यापक संदर्भ असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानशी युद्ध म्हणजे मुस्लिमविरोध नव्हे, असेच जणू बाईंनी या निवडीतून सूचित करून ठेवलेले दिसते. अर्थात अंतुले यांची इंदिरा-संजयनिष्ठा, योग्यता व इतर पक्षांतर्गत कारणे या निवडीमागे होती, हे उघडच आहे.

 शिवाय देशांतर्गत परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चाललेली आहे. महागाई आणि बेकारी वाढते आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. जातीय दंगलींनी पुन्हा डोके वर काढले आहे. विभाजनवाद जोरात आहे. हा सारा

।। बलसागर ।। ७०