हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रकट केल्याची नोंद सापडत नाही. नाझींचा नि:पात केल्यावर रशियाच्या लाल फौजा पूर्व युरोपात घुसल्या. त्यांनी अत्याचार तर केलेच, पण अनेक छोट्या देशांना गुलामही बनवले. अजून या देशांची गुलामगिरी संपलेली नाही. चीनच्या मुक्तीफौजांनी तिबेट गिळंकृत केला हा इतिहास तर ताजाच आहे. या पार्श्वभूमीवर विजयी भारतीय सैन्याची वर्तणूक फारच उमटून दिसते. युद्धातही मानवतेची किमान पातळी आपण सोडली नाही हा निश्चितच एक जागतिक उच्चांक ठरावा.
☐
मात्र याही उच्चांकाच्या आपण फार आहारी जाता कामा नये. युद्धगुन्हेगारांची कठोर व तात्काळ चौकशी झाली पाहिजे आणि या गुन्हेगारांना डाक्क्याच्या चौकातच फासावर टांगले गेले पाहिजे...
दया तिचे नाव भूतांचे पाळण। आणिक निदळण कंटकांचे ।।
- ही मानवतेची व्याख्याही आपण विसरता कामा नये.
♦
डिसेंबर १९७१
।। बलसागर ।। ६२