पान:बलसागर (Balsagar).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कासिमसाहेब सावध झाले.

 पंधरा ऑगस्टला श्रीनगरात, रीगल चौकात पंडितांना मारझोड झाली, स्त्रियांवर अत्याचार झाले. यामागे काही मंत्र्यांचा हात होता हे उघड बोलले जाऊ लागले.
 कासिमसाहेबांची चक्रे फिरू लागली.
 कासिमसाहेबांना आता फार वेळ नव्हता. दोन ऑगस्टला सादिकसाहेबांना दिलेल्या अंतिमोत्तराची मुदत संपत आली होती. कदाचित् पंडितसमाज आणि सादिक सरकार यात काही तडजोड होऊन वातावरण निवळण्याची शक्यताही निर्माण होऊ लागली होती. पुन्हा अशी तयार भट्टी मिळते न मिळते ! आता मिळेल त्या संधीवर, निमित्तावर झडप घालून घाव घातला पाहिजे.
 कासिमसाहेब आणि इतर विरोधक आपला फौजफाटा गोळा करू लागले. जमवाजमव सुरू झाली.
 तसा खुद्द कासिमसाहेबांचाच फौजफाटा खूप मोठा आहे, असा काश्मिरात सर्वत्र समज आहे. होमगार्डसवर त्यांचे वर्चस्व आहे, पोलीस-खाते त्यांना सहज वश होऊ शकते, असा बोलबाला आहे. मुळात काश्मिरात पोलीस व्यवस्था खूपच गोंधळाची. सरकारी, निमसरकारी, केन्द्रीय, गुप्तचरीय अशी अनेक पोलीसदले तथ नेहमीच असंबद्ध कारभार करीत असतात. कुणावर कुणाचे वर्चस्व आहे, कोण कुणाच्या कच्छपी आहे, हेच कळेनासे व्हावे इतकी येथे या क्षेत्रातली गुंतागुत आहे. अशा गोंधळाचा राजकारणी व्यक्तींनी आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून न घेतला तरच नवल ! पंधरा ऑगस्टला थोडीशी चुणूक दाखवली. पण तव ढयाने काम भागत नाही, दिल्ली हालत नाही, सादिक गडगडत नाही, असे पाहिल्यावर आणखी एखाद्या संधीची वाट पाहणे भाग होते. सुदैवाने (की दुर्दैवाने) सादिकविरोधी गटांना फार वाट पाहावी लागली नाही. जनसंघाचे अध्यक्ष आमंत्रण द्यावे तसे श्रीनगरात उपस्थित झाले आणि ते करायला गेले एक आणि झाले भलतेच.

 प्रा. मधोक आले ते अगदी वेगळ्या कारणासाठी. दहा खासदाराचा तहडी लडाखला भेट देण्यासाठी निघाली होती, त्यात प्रा. मधोक या समावेश होता. श्रीनगरात मुक्काम पडला, तेव्हा साहजिकच आंदोलनाच्या की सर्वांचीच बातचीत झाली. प्रा. मधोक यांनी त्यातल्या त्यात विशेष लक्ष घालून मुख्यमंत्री सादिक यांचीही या प्रकरणी भेट घेतली. या मध्यस्थीला थोडेफार यश लाभण्याची शक्यता दिसत होती. सादिक यांनी काही आश्वा-

।। बलसागर ।। ३८