पान:बलसागर (Balsagar).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यला हवे होते. कॅप्टन चाफेकर यांनी तर युद्धविराम झाल्यावर लगेचच लेख लिहून आपल्या शंका प्रदर्शित करून ठेवल्या आहेत. साप्ताहिक 'माणूस'ने ही '१ ऑक्टोबर दसरा अंका' च्या मुखपृष्ठावरच त्या वेळी आपली प्रतिक्रिया नोंदवून ठेवली- "सीमोल्लंघन झाले. विजयादशमी ?" लाहोर घेतले असते तरच विजयादशमी. नाहीतर नुसतेच सीमोल्लंघन.
 असे का घडले ? एक कारण तर उघडच आहे. अमेरिका व रशिया यांचे दडपण. अमेरिकेने मदत बंद करण्याचा धाक घातला, रशियाची काश्मिरबाबत भूमिका डळमळीत झाली. आम्हाला या वड्यांचे दडपण झुगारून देणे जमले नाही.
 पण एक अंतस्थ कारणही संभवते. शत्रूवर निर्णायक चढाई करण्याचा व्यूह आखण्यास आपल्याला सवडच मिळाली नसावी. कशावरून? थोडी पार्श्वभूमी पाहिली तर हे चटकन ध्यानात येईल. 'माणूस' १५ सप्टेंबर अंकातील 'दिल्ली दरबार' या सदरात ही पार्श्वभूमी 'दरबारीं' नी वाचकांना यापूर्वी कळविलेलीच आहे. त्यातील महत्त्वाचा भाग असा :

 "दिल्ली दरबारात गेल्या दोन सप्ताहात (दि. ७ ऑगस्टपासूनच ) जम्मू-काश्मिरचे महाराज श्री. करणसिंग यांनी बरीच व वेळीच जागृती निर्माण केल्यानेच भारत सरकारतर्फे काही भरीव उपाययोजना होत असून पाकिस्तानी आक्रमणाला पायबंद घातला जात आहे. अन्यथा ही कटकट हवी कशाला याच थाटात वा अंतर्गत धुसफुशीतच सारी शक्ती खर्च होऊन गेली असती. गेल्या दोन सप्ताहात काश्मिरमधील गंभीर परिस्थितीच्या वार्ता येथे येऊन थडकू लागल्यानंतरही येथे थंड डोक्याने चर्चा चालूच राहिली की, जम्मू-काश्मिरमध्ये एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही भारत सरकार दि. ८ ऑगस्टपर्यंत झोपलेलेच का राहिले होते ? हे सर्व जवळून पाहिले की, प्रसंगविशेषी वाट लागते की, या देशाचा जणु राष्ट्रीय गुण (?) असल्यागतच दिल्ली दरबारात चर्चा चालू होते की, याला जबाबदार कोण ? सर्व गंभीर परिस्थितीचा साकल्याने विचार करून त्या परिस्थितीवर काबू मिळविण्यासाठी तातडीचा महान प्रयत्न राहतो घटकाभर दूर व चर्चाच चालू होते की, गृहमंत्रालयाचे गुप्तचर (इंटेलिजन्स) याला जबाबदार की, संरक्षण मंत्रालयाचे गुप्तचर अकार्यक्षम ठरले....! ... दिल्ली दरबारच्या आसमंतात अशा गंभीर प्रसंगी वैचारिक गोंधळ व बुद्धिभेद घडवून आणण्याचे पवित्र (?) कार्य करणारी जी ‘कॉमरेड' मंडळी आहेत. त्यांनी सूर लावलेला आहेच की, यावेळी शास्त्रीसरकार सेनेला काश्मिरमध्ये धाडण्यास काही विशेष उत्सुक नव्हते. श्री. सादिकसाहेब होते म्हणून बरे झाले.

।। बलसागर ।। १७