पान:बलसागर (Balsagar).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर त्या कार्यक्षम आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, दुकाने, लिफ्टमधील कामे स्त्रिया करतातच; परंतु टॅक्सी चालवणे, बसड्रायव्हर म्हणूनही अनेक स्त्रिया कामे करीत आहेत. हे सगळे करून कुटुंबातही बडदास्त ठेवणेही चालूच असते. चिनी स्त्रिया अत्यंत नम्र आणि आकर्षक असल्या तरी भडक अजिबात नाहीत. इंग्लंड-अमेरिकेतील स्त्रिया जी कामे करतात ती सर्व चिनी स्त्रिया करतात, त्यांच्यासारख्या रस्त्यातून भटकत मात्र नाहीत.

 : मी जे काही पाहिले ते गांधीजींनी पाहिले असते तर त्यांना ते खचितच आवडले असते. खरोखर ज्या देशात एकही मनुष्य उपाशी नाही, एकही चिंध्या ल्यालेला नाही आणि ज्या देशात प्रत्येक मनुष्य सर्वजण सारखे असल्याने ताठ मानेने वावरतो आहे, असा देश म्हणजे गांधीजींच्या कल्पनेतील रामराज्यच. चिनी लोक त्याला फार तर माओ राज्य म्हणतील. कारण ते देवावर विश्वास न ठेवणारे आहेत. मात्र आम्ही एका बुद्ध मंदिरात गेलो असताना बुद्धाच्या प्रचंड मूर्तीपुढे शेकडो लोक गुडघे टेकून प्रार्थना करीत असताना दिसले.

 : चीनमध्ये मी जे पाहिले त्यामुळे मी फार प्रभावित झालो आणि मला रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीमधील ओळी आठवल्या.

 'मी येथून जाताना शेवटला निरोप म्हणून शब्द उच्चारावे ते हेच की, जे मी पाहिले आहे ते अगदी निरुपम-अगदी अप्रतिम आहे!'

मार्क्स-लहान शेतकरी

 लहान शेतकरी क्रांती करू शकत नाही असे मार्क्सचे मत होते. अशा शेतकऱ्यांचे जीवन फार अलग असते, परस्परसंबंध त्यांच्यात कमी असतात, गरजा स्वयंपूर्ण उत्पादनपद्धतीने भागवल्या जात असल्याने समान हितसंबंधाचे एकीकरण होऊन विशाल व व्यापक वर्गीय ऐक्याची भावना त्यांच्यात निर्माण होत नाही. जमिनीच्या लहान लहान तुकड्यांवरचे त्यांचे प्रेम फार तर 'पितृभू' (मार्क्सचा शब्द) या देशभक्ति पर जाणिवेपर्यंतच उत्क्रांत होऊ शकते असे मार्क्स म्हणतो. या संदर्भात मार्क्सने शेतकरी समाजस्थितीला बटाट्याच्या पोत्यांची उपमा दिली. या लहान जमीनधारक शेतकऱ्यांमधले परस्परसंबंध फक्त स्थानिक स्वरूपाचे असतात, त्यांच्या हितसंबंधांच्या एकजिनसीपणातून समाजघटक, समान राष्ट्रीयत्वाचा बंध किंवा राजकीय संघटना अस्तित्वात येत नाही म्हणून त्यांचा एक व बनलेला नसतो. म्हणून अशा विखुरलेल्या शेतकरी समाजाचा, जरी हा समाज बहुसंख्य असला तरी, प्रभाव पडत नाही, असे मार्क्सने आपल्या 'लुई बोनापार्तची १८ वी ब्रूमेअर' या पुस्तकात लिहिले आहे; पण माओने मार्क्सचे

।। बलसागर ।। १६०