कता आता अधिकच भासते. कारण या अगोदर अशा प्रकारची प्रगती जवळपासच्या कोणत्याही प्रदेशात घडल्याचे उदाहरण उपलब्ध नाही. लोखंडाऐवजी बांबू वापरून, कुपनलिकांचा खर्च परवडू शकला. त्यामुळे धान्योत्पादन वाढले. दोन-दोन पिकेही शेतकरी घेऊ लागले आणि त्यामुळे गरिबी हटवण्याचा किसानांचा मार्ग मोकळा झाला."
'ब्लिट्झ'चे आणि नानाजी देशमुखांचे सख्य विचारायलाच नको ! तरी पण या साप्ताहिकाच्या १५ ऑगस्ट १९८१ या अंकात असा उल्लेख आढळतो- “गोंडा प्रकल्प हाती घेतल्यापासून नानाजी देशमुखांनी मागे कधी वळून पाहिलेच नाही. केन्द्रीय मंत्रिमंडळात उद्योगमंत्र्यांची जागा देऊ केली असता त्यांनी अव्हेरली त्यांचे ध्येय, गोंधळून गेलेल्या व फसगत झालेल्या समाजाला विश्वास प्राप्त करून देणे व पटविणे की, राजकीय पक्ष वा नोकरशाही आपल्या उन्नतीसाठी काही करतील असे समजणे चुकीचे असून भारताचे उज्ज्वल भवितव्य स्वतः प्रत्येक नागरिकांच्या हाती आहे."
☐
पण गोंडा जिल्हा प्रकल्पासारखी कामे रा. स्व. संघ पुरेसा वाढला नसताना, समजा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच हाती घेता आली असती का ? त्यावेळी संघाला अनेकांनी तसे सुचविले होते. कोणी संघाने राजकारणात भाग घ्यावा असाही आग्रह चालवला होता. संघ-स्वयंसेवकातही खूप चलबिचल होती. बंदीकाळातून संघ नुकताच बाहेर पडला होता. अनेक क्षेत्रे खुणावीत होती, पण सरसंघचालक गोळवलकरगुरुजी अगदी निश्चयात्मक बुद्धीने सांगत होते -
"चार वर्षांपूर्वी प्रवास करीत असता मी बिहारमध्ये गेलो होतो. तेथे स्वयंसेवक नसलेल्या काही सज्जनांशी बोलण्याचा योग आला. त्यात काँग्रेसचे एम. एल. ए. देखील होते. त्यांनी व त्यांच्या मित्रांनी असा प्रश्न विचारला की, 'तुम्ही अनेक तरुण एकत्रित करता तर त्यांच्याकरवी काही विधायक कार्य का करीत नाही ?' मी त्यांना सांगितले की, 'आपल्या समाजात, संस्कारपूर्वक समष्टीपरायणता उत्पन्न करून, तरुणांच्या अंत:करणात एकात्मभाव निर्माण करून, एक सुव्यवस्थित, व्यक्तिव्यक्तीच्या हृदयातील समष्टिपरायणतेच्या आधारावर स्थित अशी संघटनात्मक रचना उभी करणे हे विधायक कार्य नाही काय' ?"
संघ स्वयं सेवकांसमोर २०।१०।४९ या दिवशी केलेल्या भाषणातील हा उतारा आहे. या भाषणात गुरुजींनी पुढे म्हटले आहे :
" गेली ५० वर्षे आपल्या देशात ‘कन्स्ट्रक्टिव्ह वर्क'चा घोष होत आहे. पण विचार केला तर असे दिसून येते की, कन्स्ट्रक्शनपेक्षा डिस्ट्रक्शनच जास्त झालेले