पान:बलसागर (Balsagar).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आचरणात आणल्याशिवाय कराड-ओगलेवाडीची पुनरावृत्ती टळणार नाही; हे प्रथमतः मुस्लिमांनी, ख्रिश्चनांनी ध्यानात घ्यायला हवे. कारण दंगली जरी त्यांच्या आडमुठेपणामुळे सुरू झाल्या, तरी ते संख्येने अल्प असल्याने, शेवटी नुकसान अधिक त्यांनाच सहन करावे लागणार आहे. त्यातल्या त्यात गरीब लोकांचे हाल तर अधिकच- त्यांचा काहीही दोष-अपराध नसताना. बिहारशरीफच्या दंगलीनंतर अनेक गोरगरीब मुस्लिमांना हिंदूंनी आश्रय दिला, घरी ठेवून घेतले; पण या हिंदूंबद्दल चार बरे शब्द उच्चारायला, बिहारशरीफला जाऊन आलेल्या पुण्यातील काँग्रेसछापी सेक्युलरवादी, समाजवादी मंडळींची जीभ अडखळत होती. इतका जोवर हिंदुद्वेष आहे तोवर हिंदू एकता आंदोलनवादाला तरी पर्याय कसा निर्माण होणार ? आणि का व्हावा ?

जुलै १९८२

।। बलसागर ।। १०४