पान:बलसागर (Balsagar).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाला-कोर्टाचा मनाई हुकूम धाब्यावर बसवून ! आस पासचे हिंदू मग का नाहीं खवळणार ?

 जे पुण्याला घडले, ओगलेवाडीला घडले तेच फुलवारी-शरीफला घडले. कोकणपट्टीत हे ठिकठिकाणी सध्या घडते आहे. अरबी पैशातून मोक्याच्या जमिनी गावोगाव मुस्लिम मंडळी खरेदी करीत आहेत. काही कायदेशीर मार्गाने तर काही बेकायदेशीररीत्याही. खुद्द रत्नागिरी शहरात शिवाजी पुतळ्याजवळच असा एक जमिनीचा व्यवहार होतो आहे आणि एक तणावक्षेत्र तेथे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. ओगलेवाडीला ज्या बांधकामाबद्दल हिंदू एकतावाल्यांनी आक्षेप घेतला, त्याचा विचार तेव्हाच का झाला नाही ? सर्व धर्मातील समंजस मंडळींना एकत्र करून हा वादग्रस्त बांधकामाचा प्रश्न तेव्हाच सामोपचाराने निकाली काढला गेला असता, तर आज दंगली उसळण्याची वेळच आली नसती; पण असे होणे नाही ! कारण आपला सेक्युलॅरिझम काँग्रेसछापाचा आहे, पक्षपाती आहे, फक्त हिदूंना ठोकत राहणारा आहे. मिरजेला येऊन श्रीमंत म्हातारे अरब पैशाच्या जोरावर गरीब मुस्लिम मुलींची खरेदी करतात. या विकृत चाळ्यांबद्दल तेथील हिंदू एकता आंदोलनवाल्यांनी आवाज उठवला. प्रश्न मुस्लिमांचा आहे, मला काय त्याचे, अशी संकुचित भूमिका घेतली नाही. एकाही काँग्रेसछापी सेक्युलरवाद्याने या विशुद्ध राष्ट्रीय भूमिकेबद्दल हिंदू एकतावाल्यांचे अभिनंदन केले नाही. असे जोवर घडते आहे तोवर दंगलीही अटळ आहेत. ओगलेवाडी, कराड, पुणे, फुलवारीशरीफ, बिहारशरीफ, जमशेटपूर...नावे तरी किती घ्यायची ? ही संख्या कमी करायची असेल तर हिंदू समाजाच्या खच्चीकरणावर, तेजोभंगावर आधारित काँग्रेसी सेक्युलरवादाचा वैचारिक आणि राजकीय पराभवच करायला हवा. ही प्रक्रिया सुरू झालेलीच आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात, यशवंतरावांच्या कऱ्हाडत आणि वसंतदादांच्या सांगली-मिरजेत हिंदू एकता आंदोलन उभे राहावे, याचा दुसरा अर्थ कोणता ? गांधीजी थोर महात्मे होते, नेहरू उदारमतवादी होते; पण मुस्लिम अनुनयावर आधारित असलेला त्यांचा प्रादेशिक हिंदी राष्ट्रवाद भावी पिढ्यांनी स्वीकारलाच पाहिजे असे नाही. गांधीजींचा अन्त्योदय हवा. नेहरूंचा लोकशाही समाजवाद महत्वाचा; पण दोघांचाही राष्ट्रवाद सदोष व अपूर्ण. हे राष्ट्र प्रथमत: हिंदूराष्ट्रच आहे. हे पुढे जायचे किंवा मागे पडायचे, ते हिंदू समाजाच्या पुढे जाण्यावर किंवा मागे राहण्यावरच अवलंबून आहे. या देशाचे जे काही बरेवाईट होणार, ते हिंदू समाजाच्या बरेवाईटपणावरच अवलंबून आहे. या बहुसंख्य समाजालाच या देशात चोरट्यासारखे राहायला लावणारा सेक्युलरवाद किती दिवस टिकाव धरणार ? खरा सेक्युलरवाद शिवाजीने आचरला, टिळकांनी सांगितला. गांधी-नेहरूंच्या उदयानंतर ही खरी वाट लुप्त झाली. ती पुन्हा शोधून काढून,

॥ बलसागर ॥ १०३