पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बँकेबद्दल... बचत गट बँकेशी जोडायचे ठरवले तेव्हा बायकांनी येणाऱ्या अडचणींमध्ये मुख्य अडचण सांगितली होती बँकेची भीती वाटणे. म्हणून सर्वेक्षण केले तर खालील गोष्टी समजल्या. १. तिथे खूप शिकलेली लोकं असतात. २. तिथे खूप कागदपत्रं भरावी लागतात. ३. ओळखीचं कोणीच नसतं, मग पैसे द्यायचे कसे नि मागायचे कसे ? ४. काम करणारा माणूस दिसत नाही, फक्त डोकं दिसतं! तेही कायम लिखाण करणारं. ५. खूप शांतता असते. ६. सहीशिवाय कामे होत नाहीत. ७. ओळख नसणाऱ्या पुरूषाशी पण बोलावे लागते. द चोख व्यवहारासाठी माहिती घ्यावी.. बँक लिंकेज कार्यक्रमात संस्थेनं भाग घेतला. गटांना कर्ज मिळवून देण्याचे काम चालू होते. अचानक एका गटाबद्दल बँक मॅनेजरची तक्रार आली. गट परतफेड करत नाही. गटात चौकशी केली. गटाचे जमा-खर्च कागद पाहिले. तर बँक कर्ज परतफेड दिसली. क्षणभर प्रमुखाकडं शंकेनं विचारणा केली. तिनं बँकेत पैसे जमा केल्याच्या पावत्या दाखविल्या. बँकेत फोन करून विचारलं. मॅनेजरनं तपासलं, पैसे खात्यावर जमा नाहीत. मग गटप्रमुखांना पैसे भरलेल्या पावत्यांसह बँकेत नेलं. तेव्हा उलगडा झाला की गट प्रमुखांनी नेहमीप्रमाणे पैसे बचत खात्यात जमा केले. त्यांना माहितीच दिली नाही, की कर्जाचं खातं वेगळं असतं. त्या खात्यात कर्जाची फेड जमा करायची असते. व्यवहार करताना काळजीपूर्वक जबाबदारी घेऊन माहिती घेऊन काम केले पाहिजे. हे प्रमुखांना सांगावे लागते. ★★★★★ SR. ५४