पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गट- एक अनौपचारिक शिक्षणाची संधी एका संस्थेच्या काही गट प्रमुखांशी गप्पा मारायची संधी मिळाली. त्यांच्या गटांचं बँक लिंकेज होते. SGSY योजनेत त्यांना रु. २५,०००/- खेळतं भांडवल मिळाले होते. त्यांना प्रश्न विचारला. सांगा पाहू ---- गावातला सावकार काय दरानं कर्ज देतो ? त्यांनी लगेच उत्तर दिलं ५% किंवा ७% ते १०% गट काय दरानं कर्ज देतो? २% किंवा ३%. बँक काय दराने कर्ज देते? ८.५% किंवा ९% ते ११% मग कोण स्वस्त? ___ पण हेच त्या लोकांकडून शिकल्या होत्या. बोलताना लोक व्याजाचे आकडे सांगतात ते दरसाल दर शेकडा आहे का दरमहा हे कुठे सांगतात ? मग त्यांना विचारलं- पण तुम्ही तर बँकेचे कर्ज घेतलंय ? एकीनं दीर्घ निःश्वास सोडून उत्तर दिलं, 'हो ना !' मग निरागसपणे ती म्हणाली, 'काय करणार, सरकारच्या योजनेत आम्हाला घेतलंय ना ! सबसिडीतून मिळणाऱ्या फायद्यामुळेच बँक परवडते. म्हणून तर सरकारच्या योजनांना सबसिडी दिली जाते.' 'ती' नं मलाच 'आगाऊ' माहिती दिली. ती तरी काय करणार? तिला बँकेचा दर हा वार्षिक असतो, गट व सावकारीचा कर्जदर मात्र महिन्यात सांगतात हे कोण शिकवणार ? आणि असं काहीतरी विचारलं तर लोक हसतील याची मनात भीती असतेच. बँक लिंकेज प्रशिक्षणामुळे तिला कळलं, की बँकेचा कर्जदर वर्षाचा असतो. गट आणि कोण महाग? बँक! उत्तर ऐकून मला धक्काच बसला. अनुभवातून शिक्षण भामा दरमहा गटात जास्तीचे पैसे आणायची आणि गटात जास्तीची बचत भरायची. तिला कार्यकर्तीनं पटवलं की बँकेत स्वतःचं खाजगी खातं काढून त्यात पैसे ठेवणे चांगलं. कार्यकर्तीच्या खूपच आग्रहानं ती बँकेत गेली. खात्याचा अर्ज आणला. चांगली नटून जाऊन फोटो काढले. नि उत्साहानं फोटो घेऊन गेली की बँकेत. पण खातं न काढताच परतली. विचारलं, तर म्हणाली 'बरं झालं भेटलीस. बुडता बुडता वाचले बघ!' म्हटलं, 'काय झालं?', 'अगं खात्याचा फॉर्म आणला तेव्हा तिथं मॅडम होती.' तिनं सारं समजावून दिलं. 'भारी उत्साहानं खातं काढायला गेले, तर तिच्या जागेवर 'बाबा' बसलेला. त्यानं सांगितलं, आता ती बाई या शाखेत नाही. तिची बदलीस झाली. बघ दिले असते पैसे, तर बुडले असते ना ?' __बँक ही एक नोंदणीकृत संस्था आहे. तिथं बाबा टि बसतो का बाई यावर ती चालत नाही, हे कोण बरं तिला का सांगणार ? त्याचंही प्रशिक्षण द्यावं लागतं. आजपर्यंत सावकारीचाच व्यवहार बघणाऱ्या बायांना सावकाराचा मुलगाच सावकार हे न सांगता कळतं. पण बँक मॅनेजरच्या बायकोचा बँकेशी संबंध नाही, तिच्याकडे भरलेले पैसे बँकेत जमा होत नाहीत, हे तिला कोण सांगणार ? अनुभवानंच सारं शिकायचं हेच खरं! "Epub IELDSDOS ५३