पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संघटिका प्रशिक्षण-६ शिकवणारे अनुभव! आर्थिक लाभामुळे गट सावरला... बचत गटाच्या प्रत्येक बैठकीला गटातील सर्व आपल्या गटाचं आजचं प्रत्येकीला मिळालेलं व्याज २९ सभासदांनी हजर असायलाच हवं. पण गट थोडा जुना रुपये आहे! (रु. ५८०/२० जणी = रु.२९/-) बघा, झाला की खरंतर त्यातलं एकत्र जमण्यातलं नावीन्य थोडं दिवसभर शेतात राबून जेमतेम आपण ३० रु. मिळवतो. कमी होतं, प्रासंगिक राहातं व आर्थिक घटकच अनेकदा इथं घरबसल्या फक्त व्याजाचा प्रत्येकीचा वाटा रु.२९ प्रभावी ठरतो, असं होतं ! आलाय ! जरी तो आज मिळणार नसला तरी तोपण असाच एक गट होता. दरमहा रु. ५० बचत तुमचाच आहे. सांगून ठेवते, पुढच्या महिन्यात पूर्णवळ करायचा, २० जणींचा गट. दीड वर्ष झालं. नव्याचं नवेपण गटात थांबला नाहीत तर फक्त त्या महिन्याच्या संपलं. गरजेपुरतं एकत्र जमणं सुरू झालं. पण गटाची नफ्यातला तुमचा हिस्सा म्हणून मिळणारं असं व्याज प्रमुख भलतीच हुशार. तिनं सर्वांना गोळा केलं नि सांगितलं, मिळणार नाही! ते दंडाच्या कॉलममध्ये लिहून ठेवीन. "हे बघा, या महिन्यात मासिक बचत जमली रु. १०००, गट प्रमुखांनी हक्कानं सभासदांना दम दिला, फेड झाली रु. ५००० आणि व्याज जमलं ५८० असे म्हणून बघता बघता गट सावरला गेला. सर्वांची हजेरी एकूण रु.६५८०/- झाले. पूर्णवेळ! मग सामाजिक बदल घडणाऱ्या चर्चा व्हायला “आज व्याज जमलं रु.५८०/-. याचा अर्थ लागल्या. कारण, बायकांचं गप्पा मारणं हेच तर भांडवल होता अनुभवानं समज वाढते.... गावात नव्यानं गट सुरू झाले. संस्था कार्यकर्ती म्हणाली गट २% दरमहा व्याजाने चालवा. महिला म्हणाल्या, सावकाराचा दर ५% आहे. त्यापेक्षा कमी ठरवू म्हणजे ४%. गट सभासदांचाच म्हणून शेवटी ४% दरमहा असा कर्जाचा व्याजदर ठरला.मात्र त्यामुळे गट बँक लिंकेज प्रकल्पातून वगळला गेला. कारण बँकेला अंतर्गत दर ४% चालणार नव्हता. ३ वर्षे झाली. गटाचा हिशोब झाला. व्याज वाटप केले. गट पुन्हा बसला. सभासद म्हणाले, चला आता व्याज दर २% करू. कार्यकर्ती म्हणाली, 'का ? सावकारानं दर उतरवला का?' तर गटप्रमुख समजुतीच्या स्वरात म्हणाली, 'नाही ताई, तेव्हा गटाची पहिलीच वेळ होती. त्यात संस्थेचा आग्रह गटाचे नियम बायकांनीच ठरवायचे. पैशाच्या कुणाच्या गरजा काय, आम्हाला कुठे माहिती होत्या? ३ वर्षात आम्हाला गटातल्या बायकांच्या गरजा कळल्या. कोणाला किती लागतं नि कोण कसं फेडतं, तेही कळलं. आता दर कमी करू, गटाची टक्केवारी कमी म्हणून कोणी उचलून जास्त टक्केवारीनं बाहेर दिलं तर आता मात्र लगेच बोभाटा होईल, याची खात्री वाटते'. गटातल्या महिलांची समज आता वाढते आहे. त्यांनी स्वतः निर्णय करणं महत्त्वाचं. तरच त्या घेतलेल्या निर्णयाला जागतील ! ५२