पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| संघटिका प्रशिक्षण-२ | गटावर नियंत्रण ठेवताना संघटिकेने गटासंबंधी हिशोब बघताना सभासद पासबुक, जमाखर्च पत्रक, खातेवही, मिनिट बुक (अहवाल नोंद वही) या पुस्तकांविषयी माहिती स्वत: करून घ्यावी व गटप्रमुखांना करून द्यावी. गटावर नियंत्रण ठेवताना (१) दरमहा जमाखर्च पत्रकांची जमा= खर्च (जमा व खर्च या रकमांची जुळणी) होते ना, हे तपासावे. (२) मागील रोख शिल्लक पुढे ओढली आहे ना, याची खातरजमा करावी. (३) दरसाल सभासद पुस्तकांची, सभासद खातेवहीशी तपासणी व जुळणी करावी. ह्या दोन नोंदींमध्ये काही फरक नाही ना, याची खात्री करावी. बँक लिंकेज बचत गटाचे बँकेत खाते काढून व्यवहार व्यवस्थित असेल तर बँक गटाला कर्ज देते. हे कर्ज बँकेने 'गटाला' दिलेले असते. ते गटाने पुढे सभासदाला द्यायचे असते. सभासदाने हे कर्ज गटातच फेडावयाचे असते व गट मग बँकेत 'गटाचे कर्ज परतफेड करणार असतो. अशा कर्जासाठी बचत गटाची बचत जामीन असते. ह्या कर्जफेडीला संपूर्ण गट जबाबदार असतो, गटातील कोणी एकच सभासद नाही, हे गटाने विसरू नये. गटातून सभासदाला मिळालेले कर्ज हे गटाच्या नियमाने जो व्याज दर असेल त्या प्रमाणे सभासदाला मिळालेले असते पण बँक गटाला बँकेच्या नियमाने कर्ज देते. (८.५% ते १३% दर साल म्हणजे अंदाजे पाऊण ते सव्वा टक्का दरमहा) गटात बँकेचे कर्ज वाटप करून घेतलेल्या सभासदाने बँकेपेक्षा जास्त दराने म्हणजेच गटाच्या दराने कर्ज फेड करावी म्हणजे गटाचा आर्थिक फायदाही होतो. ज्यांनी थेट कर्ज वापरलेले नाही, त्या सभासदांनाही त्याचा फायदा एकूण सेवा शुल्क अधिक जमल्याने होतो व गट सुरळीत चालतो. हे सर्व व्यवहार करताना संघटिकेने अत्यंत काळजीपूर्वक काम केले पाहिजे. कधी कधी या कामांमध्ये विविध प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावे लागते. गटप्रमुखांनी गटाच्या नावावर बँकेतून वैयक्तिकरित्या कर्ज काढले आहे व गटाला त्याबाबत पुरेसे सांगितलेले नाही, असेही घडल्याची उदाहरणे आहेत. तसेच बँकेतून कमी व्याजदराने काढलेले कर्ज गटात फेडताना गटाच्या दराने न फेडता बँकेच्याच दराने फेडून गटाचे व्याजाबाबतचे नुकसान झाले आहे, असेही काही ठिकाणी घडलेले आहे. सभासदांनी याबाबत सावध असावे व नीट अभ्यास करूनच कर्ज अर्जावर सह्या कराव्यात, याची जाणीवजागृती संघटिकेने करावी. संघटिकेने स्वत:च्या वैयक्तिक लाभासाठी ही रचना वापरणे निषिद्ध आहे. ★★★★★ EPFM ४३