पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| संघटिका प्रशिक्षण-३ | आदर्श गटाचा हिशोब । आदर्श गटाच्या हिशोबाचा तक्ता सोबत जोडत आहे. त्यासाठी खालील गोष्टी गृहीत धरल्या आहेत. १) गट सभासद संख्या २०. २) दरडोई बचत २५ रुपये. ३) दरमहा बचत २५ रु. x २० = ५०० रु. सर्व जणी देणारच. ४) सेवाशुल्क दर २% दरमहा ५) परतफेड नियम : घेतलेले कर्ज समान ५ हप्त्यात परत करायचे (गणित करताना अशीच परतफेड होईल असे गृहीत धरले आहे.) ६) (समजा) पहिल्या महिन्यापासून कर्ज देवाण-घेवाण सुरू केली आहे. जमा झालेली सर्व रक्कम कर्ज म्हणून वाटप केली आहे. गट बंद प्रक्रिया शेवटचे ४ महिने सुरू होते त्यावेळी खात्रीने कमी हप्त्यात परतफेड होणारी कर्जे दिली आहेत म्हणजे उदा. ३२ व्या महिन्यात जमणारे ७७८६/- ४ महिन्यात रु. १९४७ प्रमाणे परतफेड होईल तर ३४ व्या महिन्यात जमलेले रु. १००३८ दोन महिन्यातच रु. ५०१९ प्रमाणे परतफेड होतील असे गृहीत धरले आहे. खरे तर ही प्रक्रिया इथे गणितापुरती ३ वर्षासाठी गृहीत धरली आहे एरवी गट हे दीर्घकाळ चालणारे असतात. जर असे झाले तर ३ वर्षात मिळून काय घडते, ते खाली दिले आहे. कालावधी (३६ महिने) ३ वर्ष गटाची एकूण बचत १८००० सेवाशुल्क ७९९७ एकूण उलाढाल । १७७५७० एकूण कर्ज १५१५७२ बचत + व्याज २५९९७

  • २५ रुपये बचत करणाऱ्या गटात ३ वर्षात मिळून १८,००० बचत व ७,९९७ व्याज असे

प्रत्यक्ष २५,९९७ रुपये जमा होतात पण गटातल्या गटात पैसे खेळते राहिल्यामुळे १,५१,५७२/- रु. इतकी कर्जाची गरज पुरवली जाते हे विशेष. ★★★★★