पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| संघटिका प्रशिक्षण-१॥ काय काळजी घ्याल? रेकॉर्डसंबंधी जमाखर्च पत्रक हे हिशोबाचे सर्वात महत्त्वाचे पत्रक. दर महिन्याचा हिशोब त्यात नोंदवायचा. ही नोंद झाली की जमेची बेरीज करायची व ती बेरीज जमा झालेल्या गटाच्या रोख रकमेशी जुळवायची. ही रक्कम जुळली की हिशोबाची नोंद बरोबर आहे असे समजावे. पण कधीकधी जमाखर्च पत्रकातील जमा, रोख जमलेल्या पैशाशी जुळत नाही. तेव्हा खरं गटप्रमुखाची परीक्षा असते. ही जमा बेरीज (लेखी नोंद) व रोख जमा यातील फरक कसा बरं शोधायचा? त्यासाठी :- १) नोटा मोजताना घ्यायची काळजी अ) नोटा मोजायची सवय नसेल तर एकदम रक्कम मोजण्याऐवजी, आधी एकेका प्रकारच्या नोटा मोजाव्यात. उदा : रु. ५ X १७ असे लिहावे. सर्व नोटा मोजून झाल्यावर मग गुणाकार करावा. आ) नोटा क्रमाने लिहाव्यात म्हणजे सर्व धरल्या जातात. नाहीतर एखादा प्रकार लिहायचाच राहून जातो. १०००x ५००x = १००x ५०x २०x १०x ५x = नाणी २) जमलली रक्कम व जमाखर्च पत्रकातील नोंद जमत नसेल तर कारणे शोधून ती जमायलाच हवी. जर :-

  • ५,१०,२०,५०,५०० अशा फरकाने रोख रक्कम जमत नसेल, तर त्या प्रकारच्या नोटा तपासाव्यात.

एखाद्या नोटेमुळे हा फरक पडू शकतो.

  • २०/२५ अशा बचतीच्या रकमेने फरक पडत असेल, तर लेखन तपासावे.
  • १,१०,१०० अशा फरकाने जमत नसेल, तर बेरजेचे हातचे बरोबर घेतले आहेत ना, ते तपासावे.
  • गटाचा हिशेब झाल्यावर एखादी सभासद उशिरा आली असेल, तर तिचे जमा पैसे नोंदवून बेरजेत घेतले

आहेत ना, ते तपासावे. नोटा नेहमी २ वेगवेगळ्या व्यक्तींनी मोजाव्यात. गटात मोठे व्यवहार होत असतील, तर पैसे घेतानाच १०००/- रुपयांची बंडले करून रबर बँड लावून ठेवावेत, म्हणजे तेच पैसे पुन्हा पुन्हा मोजण्यात वेळ जात नाही. ★★★★★ ४२