पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टप्पा ३ : संघटिका प्रशिक्षण बॅक कर्जविभाग गटाची परिणामकारकता ही संस्थेच्या संघटिकेवर अवलंबून असते. गटांबद्दल नुसती आस्था असून पुरत नाही; त्यांना योग्य दिशेने नेण्यासाठी संघटिकांनीही जाणीवपूर्वक प्रशिक्षण घेण्याची गरज असते. संघटिकेनेगटप्रमुखांच्यापुढे दोन पावले असले पाहिजे. तरच तिचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल. यासाठी संघटिकांसाठीच्या प्रशिक्षणाची रचना केलेली आहे. तिने सभासदांसाठी व गटप्रमुखांसाठी तयार केलेली प्रशिक्षणे स्वत: सोडवायची आहेत. मगच या प्रशिक्षणाकडे यायचे आहे. संघटिकेने पहिल्या दोन टप्प्यांवरील प्रशिक्षणांवर प्राविण्य मिळविलेले असले पाहिजे. तसेच गटावर नियंत्रण करताना गटातील सर्वांचा फायदा होणे, गटात एकजिनसीपणा येणे हे तिला पाहता येईल. त्याकरिता आवश्यक असलेली सर्व माहिती संघटिका प्रशिक्षणमध्ये दिलेली आहे. प्रत्यक्ष सोडवायचे एकच प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणांमधून पुढील गोष्टी लक्षात येतील. १. काय काळजी घ्याल - रेकॉर्डसंबंधी गटावर नियंत्रण ठेवताना काय काळजी घ्यायची, चुका कशा तपासायच्या याची माहिती यामध्ये दिली आहे. २. गटांवर नियंत्रण ठेवताना - गटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे संघटिकेचे लक्ष असले पाहिजे, नियंत्रणासाठी प्रत्यक्ष हिशोबात पाहावयाच्या गोष्टी, बँकेचे कर्ज घेताना संघटिकेने लक्षात घ्यायचे मुद्दे, गटाचा फायदा संघटिकेने जास्तीत जास्त पाहिला पाहिजे. या दृष्टीने सूचना यात सांगितल्या आहेत. ३. आदर्श गटाचा हिशोब - गटाच्या नियमांप्रमाणे खरोखरच गट चालला तर गटाच्या उलाढाली महिन्यागणिक कशा वाढत जातात व किती मोठे व्यवहार गटाच्या जीवावर बेतता येतात, याचा अंदाज येतो. या प्रशिक्षणात दिलेल्या तक्त्याआधारे संघटिकेला गटावर नियंत्रणही ठेवता येईल. आदर्श गटाच्या हिशोबाप्रमाणे आपला गट चालवायचा असेल तर कोणती गृहितके समजून घ्यावीत, हे यावरून संघटिकेच्या लक्षात येईल. ४. गटात पैसे खेळल्यामुळे - गट व्यवस्थित नियमांप्रमाणे चालणारा असेल तर आठ महिन्यात किमान प्रत्येक महिलेला अर्थसाहाय्य व पैसे व्यवस्थित फिरल्यामुळे व्याज जास्ती मिळते, हे लक्षात येते. संघटिकेने फक्त गट व्यवस्थित चालले आहेत ना हे पाहणे अपेक्षित नसून त्यात सर्वांचा जास्तीत जास्त फायदा होतो आहे ना, हे पाहिले पाहिजे. ५. जमाखर्च पत्रक बनवा - या प्रशिक्षणात, जुलै महिन्याच्या दिलेल्या पत्रकाच्या आधारे ऑगस्ट महिन्यात कसा हिशोब असेल, यावर विचार करायचा आहे. या प्रशिक्षणातून गटाच्या पुढे पाहण्याची संघटिकेची दृष्टी तयार होण्यास मदत होईल. ६. शिकविणारे अनुभव - शिकवणाऱ्या अनुभवांद्वारे बचतगटाच्या विश्वातील अनेकानेक व्यक्तींच्या विचार करण्याच्या व वागण्याच्या पद्धती पाहून योग्य दिशेने विचार करण्यासाठीचे विषय काही प्रसंगांच्या माध्यमातून संघटिकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. का SAR ★★★★★