पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशिक्षकासाठी टिपण-गटप्रमुख प्रशिक्षण ८ स्पर्धा २ रक्कम मोजा गटप्रमुख जी कामे करतात त्यात पैसे मोजायचे काम गटप्रमुख या नात्याने त्या पहिल्यांदाच करत असतात. एरवी पैसे मोजणे वेगळे असते. गटासमोर पैसे मोजणे वेगळे असते कारण हे काम गटातील सर्वांसमोर करायचे असते. जमलेली रक्कम जमाखर्च पत्रकातील रकमेशी जुळवायला हवी असते. यात अचूकता महत्त्वाची ! गटात रक्कम मोजताना दडपण येते. त्यामुळे येत असणारे काम करतानाही गोंधळायला होते. असे होऊ नये म्हणून सरावासाठी अशी स्पर्धा घ्यावी. स्पर्धेचे नाव - रक्कम मोजा ! साहित्य - पाच रकमांची स्वतंत्र बंडले, कागद, पेन, सेकंदकाटा असलेले घड्याळ. सूचना : १) साधारण ३,०००/- च्या आसपास पाच रकमांची स्वतंत्र बंडले करावीत. प्रत्येकात वेगवेगळी रक्कम असावी. (उदा.- २,८७०/-, २,९४५/-, ३,१६२/- इ.) प्रत्येक बंडलात १०००, ५००, १००, ५०, २०, १०, ५, नाणी असे सर्व प्रकार असतील हे जाणीवपूर्वक बघावे. २) स्पर्धा गटासमोर घ्यावी. वेळ मोजणारी व्यक्ती स्वतंत्र असावी व तिने मोठ्यांदा वेळ सांगत राहावी. उदा.-३ मिनीटे १५ सेकंद, ३ मि. ३० सेकंद, ३ मि. ४५ सेकंद असे. ४) एकाच वेळी पाच जणींना गटासमोर पैसे मोजायला द्यावे. ५) रक्कम मोजून झाल्यानंतर दिलेल्या कागदावर तिच्या नावापुढे लागलेला वेळ लिहिण्यास सांगावा. निकालपत्रक खालीलप्रमाणे टेबल बनवावे. आधी बरोबर रक्कम असणाऱ्यांची यादी करावी व कमीत कमी वेळात मोजणारीचा पहिला क्रमांक काढावा. उदा.- पाकिटात २,९४५/- रक्कम होती. नाव रक्कम वेळ सीमा २८४५ २ मिनिटे ३० सेकंद सविता २९४५ ३ मिनिटे १० सेकंद गीता ३१०५ २ मिनिटे ४० सेकंद भीमा २९४५ ३ मिनिटे ४० सेकंद व० यात भीमा व सविता या दोघींनी रक्कम बरोबर मोजली पण, क्रमांक २ची सविता ही पहिली येईल. कारण तिने बरोबर रक्कम भीमापेक्षा कमी वेळात मोजली. ★★★★★ ४०