पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| चूक की बरोबर लिहा खालील विधाने बरोबर की चूक ते पुढील चौकटीत लिहावे बरोबरसाठी (/) व चूकसाठी (X)अशी खूण करा. १) दर महिन्याच्या बैठकीचा निरोप सर्व महिलांना लेखी द्यावा २) बैठकीपूर्वी, होणाऱ्या बैठकीची मिनीटस् व्यवस्थित लिहून ठेवावीत. ३) कुणाला कर्ज द्यायचे हे प्रमुखांनी ठरवून ठेवावे, म्हणजे नंतर चर्चा नको ४) गटप्रमुख ही महत्त्वाची व्यक्ती आहे. रेकॉर्ड ठेवणं ही फक्त तिची जबाबदारी आहे. ५) हिशोबात चूक होण्यापेक्षा गटप्रमुखांच्या घरच्या पुरुषांची मदत घ्यावी. F0Rs. ६) बैठकीत सामाजिक चर्चा होणंसुध्दा महत्त्वाचं, त्यानं गटाचं नाव सर्वांपर्यंत पोहोचतं. ७) मागील बैठकीत झालेले विषय या बैठकीत वाचून दाखवावेत. ८) प्रत्येकीचे सभासद पुस्तक बघून गटाची कॅश टॅली करता येते. ९) पैशाचे व्यवहार करताना आधी सर्वांची बचत घ्यावी, मग बाकी व्यवहार करावेत. १०) बँकेत पुरुषांनी गटाचे पैसे भरावेत, त्यामुळे बायकांचा खूप वेळ वाचतो. ११) गटाचा हिशोब तपासायची जबाबदारी सर्वस्वी संस्थेचीच. १२) वर्षातून एकदा तरी सर्व सभासदांनी आपापले हिशोब तपासावेत. ★★★★★ ३५